उल्हास तुयेकर Dainik Gomantak
गोवा

जिल्हा पंचायत भवन वर्षभरात पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न करू: उल्हास तुयेकर

उल्हास तुयेकर : पंचायत मंडळाकडून कुठ्ठाळीत सत्कार

दैनिक गोमन्तक

मडगाव: दक्षिण गोव्यात नावेली मतदारसंघात जिल्हा पंचायत भवन बांधण्याचा जो प्रकल्प नियोजित केला आहे तो वर्षभरात पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार (MLA) उल्हास तुयेकर यांनी दिले. (We will try to complete district Panchayat office within a year commitment by Ulhas Tuyekar)

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे सदस्य असलेले उल्हास तुयेकर हे नावेलीतून तर आंतोन वाझ हे कुठ्ठाळीतून (Cortalim) आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आज जिल्हा पंचायत मंडळाच्यावतीने या दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर उपस्थित होत्या.

तुयेकर यांनी सांगितले की, आपण जिल्हा पंचायतीचे सदस्य असल्याने या संस्थेला येणाऱ्या अडचणी काय हे मला ठाऊक आहेत. जिल्हा पंचायतींना अधिक निधी मिळण्याबरोबर त्यांना अधिकारही मिळावेत, यासाठी आपण आणि वाझ हे दोघेही विधानसभेत प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

दक्षिण गोवा (Goa) जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष खुशाली वेळीप म्हणाले, जिल्हा पंचायतीतून आमदार म्हणून निवडून येण्याची परंपरा तुयेकर आणि वाझ यांनी कायम ठेवली. यापुढे याच पंचायतीतून आणखी आमदार पुढे येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT