Mickky Pacheco Goa Election Dainik Gomantak
गोवा

जिंकून आल्यास काँग्रेसलाच पाठिंबा : मिकी पाशेको

गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे आम्हीच ठरवू, मिकी पाशेकोंची भूमिका

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची राजकीय विचारसरणी एकच आहे. त्यामुळे आम्ही जिंकून आलो तर आम्ही काँग्रेस पक्षालाच पाठिंबा देऊ मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे आम्ही ठरवू असे राष्ट्रवादीचे नुवेचे उमेदवार मिकी पाशेको यांनी सांगितले. (Mickky Pacheco Goa Election News Updates)

यावेळी काँग्रेसची (Congress) राष्ट्रवादी पक्षाशी युती नसून गोव्यात स्वतंत्ररित्या राष्ट्रवादी 10 जागा लढवीत आहे. पाशेको हे त्यांचे नुवेचे उमेदवार असून काँग्रेसचे माजीमंत्री आलेक्स सिक्वेरा यांना टक्कर देण्यास ते उभे राहिले आहेत. नुवेतून आपला विजय नक्की असा दावा पाशेको यांनी आज मडगावात पत्रकार परिषद घेऊन केला. यापूर्वी त्यांनी बाणावलीतून काँग्रेस उमेदवारीवर दावा केला होता. मात्र दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्यामुळेच आपल्याला बाणावलीची उमेदवारी मिळालेली नाही असा त्यांचा समज आहे. त्यामुळेच आज त्यांनी कामत यांचे नाव न घेता हा प्रहार केला. कुणीही मुख्यमंत्री व्हावे आणि नंतर गोव्याला लुबाडावे हे आम्ही चालू देणार नाही असे ते म्हणाले.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर भाजपात (BJP) गेलेले फिलिप नेरी रोड्रिग्स याना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. तुम्ही फुटीरांना उमेदवारी कशी दिली असे विचारले असता, त्यांना आम्ही उमेदवारी देणार नाही हे आम्ही कधीच म्हटले नव्हते. ती काँग्रेसची भूमिका होती असे पाशेको म्हणाले. त्यांच्या जाहिरनाम्याबद्दल विचारले असता, नुवेचे मतदार हे माझ्यासाठी सर्वोच्च असून ते जे काय सांगतील तोच माझा जाहीरनामा असेल असे पाशेको म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT