Olive Ridley Turtle | Olive Ridley Sea Turtle Dainik gomantak
गोवा

Olive Ridley Turtle: मोरजी किनारा विकासासाठी निर्बंधित क्षेत्र करू- विश्वजीत राणे

राज्यात ऑलिव्ह रिडले कासवांचे संरक्षण करण्यासाठी वन विभाग सक्रिय असल्याचे विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

हंगामातील पहिल्या कासवाने मांद्रे येथे अंडी दिली आहेत. संशोधक आणि इतरांसाठी हा मोठा अनुभव असू शकतो, असे म्हणत वन आणि नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी संपूर्ण मोरजी समुद्र किनारा विकासासाठी निर्बंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावे, यासाठी केंद्राकडे मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राज्यात ऑलिव्ह रिडले कासवांचे संरक्षण करण्यासाठी मजबूत व्यवस्थापन आणि प्रभावी संवर्धन उपाययोजना करण्यासाठी वन विभाग सक्रिय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वन विभाग आणि संशोधक, शास्त्रज्ञ डोंगरे यांच्या सल्ल्यानुसार मोरजी येथील सर्वेक्षण क्रमांक १२२/१ - अ आणि सर्वेक्षण क्रमांक १२२ हे अविकसित क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल आणि या भागातील पर्यावरणाचे संरक्षण आणि जतन करण्यावर भर दिला जाईल.

याशिवाय या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे बांधकाम केले जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. हा भाग विकासासाठी निर्बंधित क्षेत्र म्हणून अधिसूचित करावा, असे केंद्राला कळविले जाईल, असे मंत्री राणे यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT