GPSC Exam Update: GPSC चा मोठा निर्णय! सर्व पदांसाठी एकच सामायिक परीक्षा

प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांच्या थेट भरतीसाठी आता गोवा लोकसेवा आयोग वर्षातून एकदाच सामायिक परीक्षा घेणार आहे.
GPSC Exam Update | gpsc exam update | GPSC Exam
GPSC Exam Update | gpsc exam update | GPSC Exam Dainik Gomantak

GPSC Exam : प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांच्या थेट भरतीसाठी आता गोवा लोकसेवा आयोग वर्षातून एकदाच सामायिक परीक्षा घेणार असून त्याची कार्यवाही या नवीन २०२३ वर्षापासून होणार आहे. आयोगाने एकच परीक्षा घेण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. तो प्रस्ताव सरकारने मान्य केला असून एकच परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आयोगाचे परीक्षेचे काम सोपे आणि सुटसुटीत होणार आहे.

GPSC Exam Update | gpsc exam update | GPSC Exam
Tilari Water Resumption : पेडणेवासियांसाठी दिलासा! तिलारीतून 6 जानेवारीपासून अंशत: पाणीपुरवठा सुरू

गोवा पोलीस सेवा, गोवा नागरी सेवा व गोवा वनसेवा यातील नोकरभरतीसाठी यापूर्वी जशी पदे मंजूर होत होती, तशी परीक्षा घेण्यात येत होती. त्यामुळे वर्षातून अनेकदा परीक्षा घेतली जात होती. तसेच एकच उमेदवार अनेक परीक्षांना बसत होते. प्रत्येक परीक्षेसाठी उमेदवारास व आयोगासही वेगवेगळा आणि जादा खर्च येत होता.

GPSC Exam Update | gpsc exam update | GPSC Exam
Mahadayi Water Dispute : म्हादईप्रश्‍नी गोव्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले

या कटकटींना कंटाळून आयोगाने एकच परीक्षा सर्व पदांसाठी घेण्यात यावी असा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. त्याची आता अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष जुझे नोरोन्हा यांनी दिली आहे. नवीन वर्षात २०२३ मध्ये आयोगाच्या परीक्षेत हे नवीन परिवर्तन घडले असून ते उमेदवार आणि आयोगासाठी मोठे लाभदायक ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com