Michael Lobo
Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

महागाईसंदर्भात सरकारला योग्यवेळी जाब विचारू: मायकल लोबो

दैनिक गोमन्तक

कळंगुट: राज्यात नुकतेच नवीन सरकार सत्तारूढ झालेले आहे, त्यामुळे जनतेने त्यांना थोडासा अवधी द्यावा, वाढत्या महागाईसंदर्भात नंतर योग्यवेळी योग्य तो सवाल सरकारला करू, असे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी सांगितले.

दिवसेंदिवस राज्यात महागाई वाढत चालली आहे, पेट्रोल - डिझेलपासून ते आवश्यक कडधान्यांची किंमत सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर चालली असून आपल्यालाही या गोष्टीची कल्पना असल्याचे लोबो यांनी सांगितले. कळंगुट येथील सेंट आलेक्स चर्च समोरील चोगम रस्त्याच्या दुतर्फा नारळाच्या झाडांचे कवाथ्यांची लागवड केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत कळंगुट जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तप्रसाद दाभोलकर, कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स, श्री शांतादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग मठकर, बाबरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील वाढत्या महागाईसंदर्भात सुलक्षणा सावंत यांनी बोलण्याऐवजी स्वतः मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य करणे योग्य ठरेल, असे लोबो यांनी पुढे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT