Ukraine Russia Conflict  Dainik Gomantak
गोवा

‘आम्हालाही युक्रेनमधून गोव्यात परत यायचंय’

युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या तीन गोमंतकीय युवकांनी राज्याचे एनआरआय आयुक्तांकडे त्यांना गोव्यात परत आणण्याची विनंती केली आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: युक्रेनमध्ये यादवी माजली असून तेथे अडकून पडलेल्या तीन गोमंतकीय युवकांनी राज्याचे एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांच्याकडे ‘आम्हाला गोव्यात परतायचं आहे. काहीतरी व्यवस्था करा’ अशी विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर तिथे अडकून पडलेल्या गोमंतकीयांना परत सुखरूप गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा आशयाचे पत्र राज्य एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी केंद्रीय विदेश व्यवहारमंत्री डॉ. जयशंकर यांना लिहून त्यांना कळकळीची विनंती केली आहे.(Ukraine Russia Conflict)

युक्रेनमध्ये नेमके किती गोमंतकीय अडकले आहेत, असा सवाल आयुक्त सावईकर यांना केला असता आयोगाकडे अजून त्याची माहिती पोहोचलेली नाही. मात्र, काही गोमंतकीय नागरिकांनी माझ्याकडे मदतीची मागणी केली. मात्र, विदेश व्यवहार मंत्रालय युक्रेनमधील (Ukraine) भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे, असे त्यांनी सांगितले. युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या (Students) पालकांनी (Parents) आमच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे मी केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधला आहे. तथापि, युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी खास विमानाची सोय केली असल्याची माहिती सावईकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT