New Zuari Bridge Inauguration | CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge: गडकरीजी, पुलावर लाईट अँड साऊंड शो हवा; मुख्यमंत्र्यांची मागणी...

झुआरी पुलावर फिरते रेस्टॉरंट 100 टक्के करणार : मुख्यमंत्री सावंत

Akshay Nirmale

New Zuari Bridge: देशातील सर्वात उत्तम लाईट अँड साऊंड शो जर कुठे असेल तर तो नितीन गडकरीजींच्या नागपुरात आहे. मी तो शो पाहिला आहे. तितका चांगला नसला तरी चालेल पण, गडकरीजी या नवीन झुआरी पुलावरदेखील लाईट अँड साऊंड शो करून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. नवीन झुआरी पुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, अशा पद्धतीच्या म्युझिक आणि लाईट शोचा पर्यटनासाठी आम्हाला खूप फायदा होईल, सर्व गोयंकरांच्यावतीने मी ही विनंती करत आहे, असे मुख्यमंत्री सावंत गडकरींना म्हणाले.

झुआरी पुलावर फिरते रेस्टॉरंट 100 टक्के होणार ः मुख्यमंत्री सावंत

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, मोदी है तौ मुमकीन है. नितीन गडकरींच्या सुपिक डोक्यातून या पुलावर दोन टॉवर उभारून त्यावर फिरते रेस्टॉरंट सुरू करण्याची कल्पना आली होती. याबाबत माजी मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर यांच्याशी गडकरींची चर्चा झाली होती. दिवंगत मनोहरभाईंचा प्रोजेक्ट आम्ही पुर्ण करणार. पुलावर फिरते रेस्टॉरंट 100 टक्के पुर्ण करणार, असे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.

देशातील मोठा पुल असल्याचा अभिमान ः मुख्यमंत्री सावंत

प्रमोद सावंत म्हणाले की, झुवारी पुल देशातील मोठा पुल असल्याचा आम्हाला अभिमान आहे. प्रत्येक व्यक्तीमागे गाड्यांच्या संख्येत 45 टक्के जास्त पूर्ण देशात गोवा हे पहिले राज्य आहे. त्यामुळे पत्रादेवी ते दोडामार्ग, केरी ते मोले, मोले ते पोळे हा पश्चिम घाटातून जाणारा विमानतळ, रेल्वेला जोडणारा सर्कूलर रोड मंजुर करुन द्या अशी विनंती करतो.

मृत कामगारांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दोन लाखांची मदत

मुख्यमंत्री म्हणाले, बांबोळी ते वेर्णा काम चालू असताना 3 कामगारांचा मृत्यु झाला होता. त्या कामगारांच्या कुटुंबीयांना गोवा सरकारकडून 2 लाखांची मदत देण्यात येणार आहे. गोयकारांनी घरातील कचरा नदी किंवा इतरत्र ठिकाणी न टाकता कचरा कुंडीत टाकावा व स्वच्छ गोंय, सुंदर गोय, भांगराळ गोंय ही संकल्पना राबवूया, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून मोदी, गडकरींचा जयघोष

यावेळी गोव्याला केलेल्या सहकार्यालाबद्दल व्यासपीठावरून बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यासपीठावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या. तसेच उपस्थितांना टाळ्या वाजवून आणि घोषणा देऊन गडकरींचे कौतूक करण्यास सांगितले. उपस्थितांनीही त्यांना दाद दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT