MLA प्रवीण आर्लेकर Dainik Gomantak
गोवा

Goa Development Project: सर्व प्रभागांत समान विकास हवा, MLA प्रवीण आर्लेकर

आमदार प्रवीण आर्लेकर : पराष्टे येथे टाईल्स बसवण्यास सुरवात

दैनिक गोमन्तक

Goa Development Project: पेडणे पालिका क्षेत्राचा विकास करताना एकूण दहाही प्रभागांत समान विकास करण्यावर पालिका मंडळाने भर द्यावा. सरकारच्या माध्यमातून विकासकामांना सहकार्य करण्यात येईल, असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.

पालिका फंडातून पराष्टे येथील काळोबा मंदिर परिसरात चेकर्ड टाईल्स बसविण्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आर्लेकर बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, उपनगराध्यक्ष अश्विनी पालयेकर, नगरसेविका उषा नागवेंकर, तृप्ती सावळ देसाई, दीपक मांजरेकर, मनोज हरमलकर, शिवराम तुकोजी आदि उपस्थित होते.

आर्लेकर पुढे म्हणाले की, आपल्या प्रभागातील विकासकामे दर्जेदार व्हावीत याकडे नागरिकांनी या कामावर लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. तसेच त्याची निगा राखणे आवश्‍यक आहे. नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांनी सांगितले की, प्रत्येक प्रभागात समान निधीमधून विकास करण्याचा संकल्प सोडलेला आहे. त्यासाठी जनता तसेच नगरसेवकांचेही सहकार्य आवश्‍यक आहे.

आमदार प्रवीण आर्लेकर आणि राज्य सरकारचे सहकार्य मिळत असल्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागल्याचा दावा नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांनी केला. उषा नागवेकर यांनी पालिका क्षेत्राचा विकास झपाट्याने होत असल्याचा

दावा केला. पेडणे मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावे , असे आवाहन प्रवीण आर्लेकर यांनी केले.

रस्त्यांवरील खड्डे हॉटमिक्स पद्धतीने बुजवणार

पावसाळ्यानंतर रस्त्यांवर पडलेले खड्डे हॉटमिक्स पद्धतीने बुजवण्यात येतील. तसेच भूमिगत वीज जोडणीच्या कामाला गती देण्यात येईल, त्यामुळे मतदार संघातील विजेची समस्या सुटण्यास मदत होईल, असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT