Utpal Parrikar and TMC Dainik Gomantak
गोवा

Goa Election: ...तर आम्ही उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देऊ: TMC

भाजपने उत्पल पर्रीकर यांना पणजीतून तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढणाचा निर्णय घेतला.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पणजीत उमेदवार न उभा करण्याचा विचार करत आहे. त्याऐवजी ते अपक्ष निवडणूक लढणाऱ्या उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देणार, अशी माहिती समोर येत आहे. (Utpal Parrikar Latest News)

भाजपने (BJP) उत्पल पर्रीकर यांना पणजीतून (Panaji) तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढणाचा निर्णय घेतला. आम्ही जिंकू शकणाऱ्या जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आम्हाला विश्वास आहे की, पणजीमध्ये उत्पल पर्रीकर बाबूश मोन्सेरात यांचा पराभव करतील म्हणून आम्ही त्याला पाठिंबा देऊ इच्छितो. याबाबत पुढील 24 ते 48 तासांत निर्णय घेतला जाईल, असे TMC च्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्याने सांगितले.

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी असल्यामुळे तृणमूल काँग्रेसला (TMC) याबाबत लवकर निर्णय घ्यावा लागेल, असे दिसत आहे.

उत्पल हे निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा देणार नाहीत, असे आश्वासन मिळवण्याचा तृणमूल प्रयत्न करत आहे. निवडून आल्यावर उत्पल पर्रीकर यांनी भाजपला पाठिंबा दिल्यास तृणमूल विचित्र परिस्थितीत सापडेल. तृणमूलच्या सूत्रांनी सांगितले आहे की, उत्पल यांच्या "निवडणुकीनंतरच्या योजने" बद्दल पूर्ण स्पष्टता आल्यानंतरच त्यांना पाठिंबा देण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT