Colvale Jail Raid: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात पोलिसांचा छापा

पोलिसांचे विविध ठिकाणी छापे मारण्याचे सत्र सुरू आहे.
Colvale Jail Raid
Colvale Jail RaidDainik Gomantak
Published on
Updated on

Colvale Jail Raid: बार्देशमधील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात तुरुंग प्रशासनाने आज (बुधवारी) छापा मारला आहे. यात सुमारे 74 मोबाईल फोन आणि मोठया प्रमाणात गांजा जप्त केला. तसेच 2 लाख रुपये रोख रक्कमही तुरुंग प्रशासनाने जप्त केली. (Goa Police Latest News)

Colvale Jail Raid
पार्सेकर यांच्या 'घरवापसी'साठी भाजप नेते प्रयत्नशील: प्रमोद सावंत

विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यात गोवा पोलिसांचे विविध ठिकाणी छापे मारण्याचे सत्र सुरू आहे. कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात तुरुंग प्रशासनाची कडक सुरक्षा असते. परंतु असे असूनही तुरुंगात मोबईल, गांजा, आणि रोख रक्कम कशी काय मिळू शकते? असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. इतकी कडक सुरक्षा असूनही जर असे प्रकार घडत असतील, तर कैद्यांना तुरुंग प्रशासनापैकी काही अधिकारी सामील तर नाहीत ना, अशी शक्यता सर्वत्र वर्तवली जात आहे. या संपूर्ण घटनेबाबत अधिक तपास प्रशासनामार्फत सुरू आहे.

मागील काही दिवसात पोलिसांनी (Police) अनेक ठिकाणाहून बेकायदेशीर मद्य, रोख रक्कम, ड्रग्स अशा अनेक अवैध वस्तू जप्त केल्या आहेत. यातच सोमवारी कोकण रेल्वे पोलिसांनी मडगाव रेल्वे (Railway) स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरुन 25,100 रुपये किमतीच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या 139 दारूच्या बाटल्या जप्त केल्या. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस राज्यात 24 तास सतर्क राहून गुन्हे घडू नयेत यासाठी प्रयत्नशील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com