Kiran Kondolkar  Dainik Gomantak
गोवा

निवडणुकीवेळीच आम्हाला तृणमूलचा वाईट अनुभव आला होता: किरण कांदोळकर

कांदोळकरांचा राजीनामा : पीकेंच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी

दैनिक गोमन्तक

म्हापसा: विधानसभा निवडणुकीवेळीच आम्हाला तृणमूल काँग्रेसचा (TMC) वाईट अनुभव आला होता. परंतु, आम्ही त्यावेळी एकदा उचललेले पाऊल मागे घेऊच शकत नव्हतो, अशी खंत थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी व्यक्त केली. (we are dissatisfied with TMC from election days says Kiran Kandolkar)

तृणमूल काँग्रेसच्या गोवा (Goa) प्रदेशाध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कांदोळकर यांच्यासमवेत म्हापशातील उमेदवार तारक आरोलकर, पर्वरीतील उमेदवार संदीप वझरकर, शिवोलीतील उमेदवार लिओ डायस, हळदोणे विधानसभा मतदारसंघातील काही पंचायत सदस्यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते सर्वजण या वेळी उपस्थित होते.

यावेळी कांदोळकर म्हणाले, दोन दिवसांपूर्वी कविता कांदोळकर यांनी तसेच तेथील सहा पंचायतींच्या बत्तीस सरपंच-पंचसदस्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. लोकांनी मागणी केल्यामुळेच आम्ही पक्षाचा नाईलाजाने राजीनामा दिला आहे.

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून मी चूकच केली, असे आता वाटते. परंतु, त्याबाबत पश्चात्ताप होत नाही. कारण त्या घटना घडून गेल्या आहेत. त्या वेळी मी नकळत त्यांच्या आश्वासनांना भुलून आकर्षित झालो होतो. भाजपला सत्तेवरून हटवण्यासाठी सर्व विरोधकांनी संघटित होणे, ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

कांदोळकर म्हणाले, तृणमूलला मिळालेली मते उमेदवारांनी वैयक्तिक लोकप्रियतेवर मिळवली होती. उलट, तृणमूलमुळे काही ठिकाणी संबंधित उमेदवारांची मते कमी झाली. पक्षाने उमेदवारांना प्रत्येकी केवळ 25 लाख रुपये दिले होते. इतर बराच खर्च संबंधित उमेदवारांना स्वत:च्या खिशातून करावा लागला.

काही दिवसांपूर्वी मी पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) जाऊन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना भेटून आलो होतो. परंतु, गोव्यात पक्षाचे कार्य वाढवण्यासाठी कोणताच ठोस आराखडा पक्षाकडे नाही, असे मला प्रकर्षाने जाणवले, असे कांदोळकर म्हणाले.

33 टक्के मते मिळवलेल्या भाजप सरकारला सत्तेवर आणण्यास विरोधी पक्ष जबाबदार असून, त्यात काँग्रेसचे पी. चिदंबरम, तृणमूलचे प्रशांत किशोर तसेच आप, आरजीचे नेते जबाबदार आहेत, असा आरोप कांदोळकर यांनी यावेळी केला.

आयपॅक’चे प्रशांत किशोर यांच्यावर टीका करताना कांदोळकर म्हणाले, निवडणुकीवेळची बिले अदा करण्यात पक्षाला आलेल्या अपयशाबाबत तेच जबाबदार आहेत. गोव्यात राजकीय स्ट्रॅटेजी राबवण्यात पूर्णत: ते अयशस्वी ठरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT