Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: वायनाड येथील घटना डोळे उघडणारी, पर्यावरणीय मोहिमेत सहभागी व्हा; मुख्यमंत्री सावंत

Pramod Sawant About Wayanad Landslide: आईच्या नावाने झाड लावून या पर्यावरणीय मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: जगभरात हवामान बदलाचे दुष्परिणाम आज जाणवत आहेत. वायनाड येथील घटना ही डोळे उघडणारी भयानक अशी आहे. त्यातून बोध घेताना सर्वांनी आपल्या परिसरात झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक पेड मॉं के नाम’ या संकल्पनेतून आज प्रत्येक देशवासीयाने आपल्या आईसमवेत, आई नसल्यास आईच्या नावाने झाड लावून या पर्यावरणीय मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

भाजप सहकार विभागातर्फे हाऊसिंगबोर्ड साखळीतील स्व. जगन्नाथ जोशी सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात झाडे लावण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सहकार विभागाचे राज्य प्रमुख पांडुरंग कुट्टीकर, साखळी विभाग प्रमुख अनिल काणेकर, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगरसेविका रश्मी देसाई, दीपा जल्मी, कुडणेचे सरपंच बाबला मळीक, ब्रह्मानंद देसाई, रघुदास तारी, गजानन शेट्ये व इतरांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एक झाड लावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT