Watermelon in Goa Dainik Gomantak
गोवा

कलिंगडाच्या शेतीतून मोठ्या नफ्याची शेतकऱ्यांना अपेक्षा

सतत दोन वर्ष दुर्मिळ रोगाचा कलिंगड पिकावर प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

दैनिक गोमन्तक

मडगाव : अवकाळी पावसामुळे गोव्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र त्यावरही मात करत प्रतिबंधात्मक उपाय करुन शेतकऱ्यांनी विविध पिकं घेतली आहेत. वेर्णा आणि दक्षिण गोव्यातील काही शेतकऱ्यांनी कलिंगडाच्या शेतीतून नुकसान भरुन काढण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी यावर्षी कलिंगडाची शेती केली असून मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी कंबर कसली आहे. (Watermelon in Goa News Updates)

शेतकऱ्यांचं पावसासोबतच (Rain) कोरोना निर्बंधांमुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यातच सरकारी मदतही न मिळाल्याने गोव्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा कलिंगडाचं उत्पन्न चांगलं आलं असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र शेतकरी अजूनही सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहे. कीटकनाशकांचा योग्य वापर केल्याने पिकांचं नुकसान कमी झालं आहे, तसंच चांगलं उत्पन्नही आल्याने आर्थिक फायदा होईल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कृषी मंत्री बाबू कवळेकर (Babu Kavlekar) यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची घोषणा केली होती. मात्र अद्याप कोणतीही सरकारी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वेर्णा, माजोर्डा, उतोर्डा येथील शेतकऱी मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने हंगामी कलिंगडाचं पीक घेतात. या हंगामात कलिंगडाच्या उत्पादनावरच त्यांची उपजीविका चालते. मात्र 2020 मध्ये कलिंगडाच्या पिकावर एका दुर्मिळ रोगाचा प्रादुर्भाव झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, 2021 मध्येही याच रोगामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) हातचं पीक गेलं. यावर्षी रोगावर प्रतिबंधात्मक उपाय केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचं वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT