CM Pramod Sawant, Vishwajit Rane And Deviya Rane X- Pramod Sawant
गोवा

Sattari: 15 गावांना मिळणार शुद्ध पाणी; सत्तरीत वेलनेस डेस्टिनेशन सेंटर, इको कॉटेज & जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्गाटन

Sattari Valpoi New Projects: वीजपुरवठा सुधारण्यासाठी भूमिगत ११ केव्ही केबल्सच्या प्रकल्पाचा शुभारंभही करण्यात आला, ज्याचा फायदा हजारो घरांना होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: जलशुद्धीकरण प्रकल्प (Water Treatment Plant), वेलनेस डेस्टिनेशन सेंटर (Wellness Destination Center) तसेच इको कॉटेज (Eco Cottage) आदी प्रकल्प हे सत्तरीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. सत्तरी तालुक्याच्या (Sattari) विकासाला आत्ताच सुरुवात झाली आहे. हा विकास असाच सुरू राहणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मोर्ले येथे आयोजित विविध प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री मंत्री विश्वजीत राणे, ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर आणि आमदार डॉ. दिव्या राणे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सत्तरीत परिवर्तनकारी विकास प्रकल्पांचा शुभारंभ सोमवारी (०९ डिसेंबर) करण्यात झाला. या उपक्रमांतर्गत मोर्ले पाणी पुरवठा प्रकल्पाद्वारे १५ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रामुळे १५ गावांना शुद्ध आणि सुरक्षित पाण्याचा सातत्यपूर्ण पुरवठा होणार आहे.

अंजूणे येथील वेलनेस डेस्टिनेशन सेंटर आणि इको-कॉटेज यामुळे शाश्वत पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिक रोजगार संधी निर्माण होतील आणि पर्यावरणपूरक विकास साधला जाईल. याशिवाय श्री सातेरी आजोबा मंदिराच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाने सांस्कृतिक वारसा जतन केला जाणार आहे.

वीजपुरवठा सुधारण्यासाठी भूमिगत ११ केव्ही केबल्सच्या प्रकल्पाचा शुभारंभही करण्यात आला, ज्याचा फायदा हजारो घरांना होईल. या प्रकल्पांमुळे स्थानिक जीवनमान उंचावणे, आर्थिक प्रगतीला चालना देणे आणि शाश्वत विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

स्वागत आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले. यावेळी मान्यवरांसह विविध पंचायतींचे सरपंच, पंच सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मला अन् मोदींनाही प्रेम द्या!

सत्तरीवासीयांनी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्यावर प्रेम केले, त्यानंतर विश्वजीत राणे आणि आमदार दिव्या राणे यांना अर्थात एकूणच राणे कुटुंबीयांना भरभरून प्रेम दिले. तसे मला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही थोडे प्रेम द्यावे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मोर्ले येथील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT