Water Tank Missing In Curti-Khandepar Ponda Dainik Gomantak
गोवा

पाच लाखांची पाण्याची टाकी गेली चोरीला! गोव्यातील 'या' गावात सरकारचा अनागोंदी कारभार आला समोर

टाकीचा पत्ता नाही मात्र काम पूर्ण झाल्याचा माहिती फलक आणि मुख्यमंत्री व जलसंसाधन मंत्र्यांचा फोटो असल्याचा फलकही येथे उभारण्यात आला आहे.

Pramod Yadav

Water Tank Missing In Curti-Khandepar Ponda: मराठीत काही वर्षांपूर्वी मकरंद अनासपुरे यांनी अभिनय केलेला 'जाऊ तिथे खाऊ' नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात मकंरद अनासपुरे त्यांची न बांधलेली पण मंजूर झालेली विहीर चोरीला गेली अशी तक्रार दाखल करतात आणि त्यानंतर झालेली सगळी गंमत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

गोव्यातील एका गावात देखील पाच लाख रूपये खर्च करून पाण्याची टाकी बांधून पूर्ण झाली, त्याचे फलक देखील लागले मात्र, प्रत्यक्षात तिथे टाकीच नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे टाकी चोरीला गेली का प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

झाले असे की, पंचमी- खांडेपार येथे अमृत सरोवर योजनेअंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यासाठी 4 लाख 94 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला. मंजूर प्रस्तावानुसार टाकीच्या बांधकामाला 29 जुलै 2022 मध्ये सुरूवात झाली आणि 15 ऑगस्ट 2022 मध्ये काम पूर्ण देखील झाले. म्हणजेच अवघ्या दीड महिन्यात टाकी बांधून पूर्ण झाली.

याबाबत बांधकाम सुरू, पूर्ण, खर्च, जागा आणि गोवा सरकार फलक देखील लागला. मात्र, ज्या जागेवर टाकी बांधली असे सरकार म्हणते तिथे प्रत्यक्षात टाकीच नसल्याचा धक्कादायक आणि अनागोंदी कारभार समोर आला आहे.

जलसंसाधन खात्याने बांधलेल्या या टाकीचे काम फक्त कागदोपत्री पूर्ण झाले असे दाखविण्यात आले असून, प्रत्यक्षात या जागेवर टाकीच नसल्याचे ग्रामस्थ तिचा शोध घेत आहेत. जलसंसाधन खात्याने अमृत सरोवर योजनेअंतर्गत 2022 साली कुर्टी - खांडेपार पंचायत क्षेत्रातील पंचमी येथे पाण्याची टाकी बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

टाकीचा पत्ता नाही मात्र काम पूर्ण झाल्याचा माहिती फलक आणि मुख्यमंत्री व जलसंसाधन मंत्र्यांचा फोटो असल्याचा फलकही येथे उभारण्यात आला आहे. 15 ऑगस्ट रोजी हे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा येथे ध्वजारोहन देखील आल्याचे स्थानिक सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सींसाठी डिजिटल मंचाद्वारे एकसमान दर, सर्व पंचायतींच्या सेवा करणार ऑनलाईन; मंत्री माविन गुदिन्हो यांचे प्रतिपादन

Rashi Bhavishya: प्रेरणादायी दिवस! 'या' राशींचे बदलणार दिवस; वाचा संपूर्ण राशीभविष्य

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

SCROLL FOR NEXT