Water Suppy in Goa | Protest in  
गोवा

Water Suppy in Goa : पाण्याचे कनेक्शन कापल्याने संताप; रामनगरी रहिवाशांचा अभियंत्यांना घेराव

रामनगरी परिसरात सांडपाणी वाहिनी टाकून पाच वर्षे झाली तरी ती कार्यान्वित केलेली नाही.

सुशांत कुंकळयेकर

Water Suppy in Goa : घरातील सांडपाणी रस्त्यावर वाहात असल्याचं कारण देत आरोग्य खात्याच्या आदेशावरून कुडतरी मतदारसंघातील रामनगरी येथील सुमारे 1000 लोकांचं पाण्याची कनेक्शन तोडण्यात आलं आहे. याच कारणामुळे संतप्त झालेल्या लोकांनी आज बुधवारी सांडपाणी महामंडळाचे कार्यकारी अभियंता प्रकाश पै याना घेराव घातला. यावेळी त्यांच्याबरोबर कुडतरी जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य मोरेन रिबेलो हेही उपस्थित होते.

रामनगरी परिसरात सांडपाणी वाहिनी टाकून पाच वर्षे झाली तरी ती कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे या भागातील लोकांनी या वाहिनीच्या जोडणीसाठी सात महिन्यांपूर्वी अर्ज करूनही त्यांना अजून कनेक्शन मिळालेले नाही. अशा परिस्थितीत या रहिवाशांचे सांडपाणी रस्त्यावर वाहते असे कारण पुढे करून काल मंगळवारी त्यांचे पाण्याचे कनेक्शन कापल्याने पाण्यासाठी त्यांचे हाल झाले. त्यासाठीच आज या परिसरातील नागरिक अभियंत्याच्या कार्यालयावर चाल करून आले.

यावेळी बोलताना रिबेलो यांनी एका शुल्लक गोष्टीसाठी ही वाहिनी कार्यान्वित करण्यापासून बंद ठेवली असून सरकारी अनास्थेचा बळी मात्र लोक ठरत आहेत. सांडपाणी वाहून जाण्याची पुरेशी व्यवस्था सरकार करू शकत नसेल तर त्याचा दंड लोकांना का असा सवाल केला.

या रहिवाशांनी मागच्या एप्रिल महिन्यात या जोडण्यासाठी अर्ज केले होते. मात्र एक पॅनल बसवायचे बाकी आहे असे सांगून ही वाहिनी कार्यान्वित केली जात नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हे काम होत नसेल तर त्या खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी राजीनामा देऊन घरी बसावे असेही ते म्हणाले.

दरम्यान हे पॅनल बसवायचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल तोपर्यंत या भागातील लोकावर कुठलीही कारवाई करू नये अशी मागणी आम्ही आरोग्य खात्याकडे करणार आहोत. या लोकांना या वाहिनीच्या जोडण्या लवकरच मिळतील, अशी माहिती सांडपाणी व्यवस्थापन महामंडळाचे कार्यकारी अभियंते पै यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT