Vijai Sardesai : ...अन्यथा भरती आयोग सरकारी हातातील बाहुले ठरेल

नोकर भरती आयोगाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नेमण्याची गरज
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik gomantak
Published on
Updated on

Vijai Sardesai : गोव्यातील सरकारी नोकऱ्या यापुढे नोकर भरती आयोगाच्या माध्यमातून भरल्या जातील अशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा केली आहे तिचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी स्वागत केले आहे. मात्र आयोग स्वतंत्र असावा आणि त्याच्या अध्यक्षपदी गोव्यातील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

हा आयोग निवळ फार्स ठरू नये आणि त्याचा अध्यक्ष सरकारी हातातील बाहुले ठरू नये अशी अपेक्षा सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठीच या आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाही नोकरशहा किंवा अधिकाऱ्याची नेमणूक केली जाऊ नये, ज्याचा वार्षिक कार्यक्षमता अहवाल मुख्यमंत्री स्वतः लिहित आहेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

यापूर्वी या भाजप सरकारने सरकारी नोकऱ्या विकल्या. आज प्रमोद सावंत सरकारात जे मंत्री आहेत त्यांनीच आरोप यापूर्वी केला होता. त्याचे आता पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आयोग स्वतंत्र व सक्षम असण्याची गरज सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. अन्यथा सरकारी नोकऱ्या पुन्हा एकदा भाजपचे कार्यकर्ते आणि मंत्र्यांचे वशिल्याचे तट्टू यांनाच दिल्या जातील अशी शंका देसाई यांनी व्यक्त केले आहे.

Vijay Sardesai
Kantara Movie : CM प्रमोद सावंतांनी पाहिला चित्रपट; म्हणाले, दोन गोष्टी लक्षात...

यापूर्वी राज्य निवडणूक आयोगावर सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यानंतर पालिका निवडणुकीत कशाप्रकारे घोळ घातला गेला त्याचे उदाहरण गोव्याच्या जनतेसमोर आहे. हा घोळ निस्तरण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागले. त्यामुळे नोकर भरती आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायाधीशांचीच नेमणूक करावी ही आमची मागणी आहे अन्यथा पुन्हा एकदा हाही आयोग सरकारी हातातील बाहुले बनणार यात शंका नाही असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

vijai sardesai warns goa govt
mla vijai sardesai slams goa govt
MLA Vijai Sardesai Court Warning
Goa SSC Recruitment
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com