Goa Water Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: पणजीत आता पाणीपुरवठा यंत्रणाही ‘स्मार्ट’!

Imagine Panjim Smart City Development Limited: ओपा येथील जलप्रकल्प केंद्रावर पंप, मोटार, ट्रान्सफॉर्मर, पंप हाऊसची उभारणी अशा बाबी नव्याने करण्यात आल्या आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी शहर स्मार्ट होत असल्याने या शहरासाठी जलपुरवठा करणारी यंत्रणाही नव्याने बसविल्याचे स्पष्ट होत आहे. ओपा येथील जलप्रकल्प केंद्रावर पंप, मोटार, ट्रान्सफॉर्मर, पंप हाऊसची उभारणी अशा बाबी करण्यात आल्या आहेत. त्यासाठी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) ३५ कोटी ९६ लाख ९५ हजार ९४४ रुपये खर्च केले आहे.

आमदार दिगंबर कामत यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नावर नगर विकास खात्याच्यावतीने मंत्री विश्‍वजित राणे यांनी लेखी उत्तरात खर्चाचे विवरण दिले आहे. आयपीएससीडीएलने जी पणजी शहरात ३५ कामे सुरू केली आहेत, त्याविषयी कोणता कंत्राटदार नेमला, कोणाला किती पैसे अदा केले, किती टक्के काम पूर्ण झाले याचा सर्व तपशील देण्यात आला आहे.

स्मार्ट सिटीच्या कामांवरून यापूर्वीच गदारोळ सुरू आहे. विलंबाने सुरू झालेली कामे, शहरात साचत असलेले पाणी, कामांच्या दर्जाविषयी पणजीच्या आमदारांनीच उपस्थित केलेले प्रश्‍न यावरून यापूर्वीच्या विधानसभा कामकाजात पडसाद उमटलेले आहेत. या कामांचे ऑडिट करण्याची व श्‍वेत पत्रिका काढण्याची मागणी विरोधकांनी केलेली आहे.

आयपीएससीडीएलने नगर विकास खात्याच्या माध्यमातून जो काही खर्च केला आहे, त्याविषयी निश्‍चित शंका उपस्थित होण्याचीही शक्यता आहे. यापूर्वीच्या पंप हाऊसमधूनच तिसवाडीला तथा पणजीलाही पाणी येत होते. त्यासाठी जी यंत्रणा उभारली होती, ती कालबाह्य झाली होती का? असाही प्रश्‍न आहे. ज्याप्रमाणे कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत, त्यावरून शंका उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाहीत.

हजारो कोटींचा निधी!

पणजी शहराला स्मार्ट करण्यासाठी केंद्राकडून हजारो कोटींचा निधी आला. त्यातील खास करून पणजी शहरासाठी ओपा येथे जलप्रक्रिया प्रकल्पावर पंपहाऊसची निर्मिती, नव्या ट्रान्स्फॉर्मरची उभारणी आणि नव्या मोटारची खरेदी केली गेली आहे. पणजी शहरातून जलवाहिनीही नव्याने टाकण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

8th Pay Commission: '8 व्या वेतन आयोगा'ची लगबग: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार मोठी वाढ, काम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT