Panaji Smart City: ‘इमॅजिन पणजी’ शरण! कामे अपूर्णच; मुदतवाढीसाठी कंपनी आज करणार विनंती अर्ज

Panaji Smart City: पणजीतील ‘स्मार्ट सिटी’ची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण केली जातील, अशी हमी ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली होती.
Imagine Panaji Smart City Development Limited will file a petition in the High Court for extension of time to complete the works of Panaji Smart City
Imagine Panaji Smart City Development Limited will file a petition in the High Court for extension of time to complete the works of Panaji Smart City
Published on
Updated on

Panaji Smart City: पणजीतील ‘स्मार्ट सिटी’ची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण केली जातील, अशी हमी ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली होती. परंतु, आश्‍‍वासनपूर्तीत अपयश आले आहे. कामांचा स्थिती अहवाल सादर करण्‍यात आला असून, सरकार पुरते तोंडघशी पडले आहे.

कामांचा स्थिती अहवाल ११ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आयपीएससीडीएलने आज न्यायालयात अहवाल सादर केला, त्यात पूर्ण झालेल्या कामांचे विवरण दिले आहे. परंतु अजूनही कामे सुरूच आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती उद्या आयपीएससीडीएल न्‍यायालयाला करणार आहे.

पणजीतील ‘स्मार्ट सिटी’च्या कामांच्‍या स्थितीचा अहवाल आयपीएससीडीएलने खंडपीठात सादर केला. या तीन पानी अहवालात मध्यवर्ती पणजीतील काम पूर्ण झाल्‍याचे तर सांतिनेजमधील १५० मीटरचे ताडमाड मंदिर ते सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एलटीपी) पुलापर्यंतचे तीन मॅनहोलचे २५ टक्के काम बाकी असल्‍याचे नमूद केले आहे. हे उर्वरित काम पूर्ण करण्याच्या मुदतवाढीसाठी कंपनी १२ जून रोजी अर्ज करणार असल्याने आता जनहित याचिकांवरील सुनावणी १८ जूनला ठेवली आहे. आयपीएससीडीएल कंपनीचे मुख्य सरव्यवस्थापक एदुआर्द पेरेरा यांनी आज खंडपीठाला अहवाल सादर केला.

सांतिनेजमधील 25% कामे बाकी

मध्यवर्ती पणजी व सांतिनेज अशा दोन विभागात कामे करण्यात येत आहेत. पणजी मध्यवर्ती परिसरातील सुमारे ३.५ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून तो खुला करण्यात आला आहे. तर, सांतिनेज परिसरातील ३ किलोमीटर अंतरापैकी २.८५ किलोमीटर अंतराची कामे पूर्ण झाली आहेत. ताडमाड मंदिर ते एसटीपी पुलापर्यंतचे काम सुरू असून, ते फक्त २५ टक्के बाकी राहिले आहे. तेथे राहणाऱ्या रहिवाशांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था असल्याने या कामामुळे कोणतीही गैरसोय होत नसल्याचे अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.

Imagine Panaji Smart City Development Limited will file a petition in the High Court for extension of time to complete the works of Panaji Smart City
Panaji Smart City : पणजी ‘राम भरोसे’; ‘स्मार्ट सिटी’ कामांची डेडलाईन आज संपणार

कामांच्या विवरणासह अहवाल सादर करणे होते अपेक्षित

मध्य पणजीतील मुख्य तीन रस्ते, मळ्यातील रस्ते, चर्च स्क्वेअरसमोरील रस्ते, कॅफे भोसले चौकातील काम पावसाळ्यानंतरच होणार आहे. मुख्य तीन रस्त्यांची कामेही पावसाळ्यानंतर होतील, असे यापूर्वीच आयपीएससीडीएलने जाहीर केले आहे. शिवाय जेथे रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे, तेथे पदपथांचे काम अपूर्ण आहे. याचे सविस्तर विवरण अहवालात नमूद करणे आवश्‍‍यक होते, पण ते आयपीएससीडीएलने दिलेले नाही.

Imagine Panaji Smart City Development Limited will file a petition in the High Court for extension of time to complete the works of Panaji Smart City
Smart City Panaji: 'स्मार्ट सिटी'ची डेडलाईन दोन दिवसांवर; रात्री रस्ते अचानक केले बंद, वाहनचालक त्रस्त

सूचना, हरकती सादर करा

‘स्मार्ट सिटी’ची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन कंपनीतर्फे खंडपीठात देण्यात आले होते. मात्र अजूनही कामे सुरू असल्याने कंपनीकडून मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज उद्या खंडपीठात सादर केला जाईल, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल यांनी खंडपीठाला दिली. कंपनीने सादर केलेल्या अहवालाची प्रत जनहित याचिकादारांनाही देण्यात आली आहे. या अहवालाबाबत त्यांच्या काही हरकती वा सूचना असल्यास पुढील सुनावणीवेळी सादर करण्यास खंडपीठाने सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com