Tillari Dam Water Supply Dainik Gomantak
गोवा

Tillari Dam: तिळारीतून पाणीपुरवठा कधी सुरू होणार? बार्देशसह साळगाव, पर्वरीवासीयांचे पाण्याविना हाल!

तिळारीहून गोव्याला कच्च्या पाण्याचा होणारा पुरवठा अद्याप पूर्ववत झाला नसल्याने पर्वरी तसेच साळगाव मतदारसंघातील नागरिकांची सध्‍या पाण्‍यासाठी वणवण सुरू आहे.

Kavya Powar

Tillari Dam Water Supply: तिळारीहून गोव्याला कच्च्या पाण्याचा होणारा पुरवठा अद्याप पूर्ववत झाला नसल्याने पर्वरी तसेच साळगाव मतदारसंघातील नागरिकांची सध्‍या पाण्‍यासाठी वणवण सुरू आहे.

कालवा दुरुस्तीची कामे करण्यासाठी तिळारीचे कच्चे पाणी बंद केल्याने पर्वरी येथील १५ एमएलडी प्रकल्प बंद पडला आहे आणि तिळारीतून पाणी सोडले जात नाही तोपर्यंत पर्वरीतील जलशुद्धीकरण प्रकल्‍प पुढचे काही दिवस तरी पुन्हा सुरू होऊ शकत नाही, असे साबांखा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे मागील महिनाभरापासून सुरू असलेले बार्देशवासीयांचे पाण्यासाठीचे हाल संपण्याची चिन्हे दिसत नाहीयत.

तिळारीतून पाणीपुरवठा करणे सध्‍या तांत्रिक कारणास्तव शक्य नाही. पाण्याअभावी नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रत्येक ठिकाणी नियोजनानुसार पाणीपुरवठा केला जातोय. काही ठिकाणी दिवसाआड तर काही भागात प्रत्‍येक दिवशी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ग्राहकांवर कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी प्रयत्न केले जाताहेत, असे साबांखा अधिकाऱ्याने सांगितले.

विशेष म्‍हणजे आजपासून राज्‍यात नाताळ सण सुरू झाला आहे. परंतु बार्देशवासीयांवर या सणाच्‍या काळात पाण्‍यासाठी दाहीदिशा भटकण्‍याची वेळ आली आहे. २१ डिसेंबरपासून तिलारी कालव्यातून पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे आश्वासन सरकारी पातळीवरून देण्यात आले होते.

मात्र, आज सोमवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरू झाला नव्हता. त्यामुळे पर्वरी तसेच साळगावातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आता नव्या वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे संकेत मिळताहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT