23 year old youth drowned in Baina sea Dainik Gomantak
गोवा

Baina Beach: बायणा किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स बोटीवर काम करणाऱ्या युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू...

युवक जलक्रीडा करणाऱ्या एका नौकेवर कामाला होता

Kavya Powar

23 year old youth drowned in Baina sea

बायणा समुद्रकिनाऱ्यावर अंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 23 वर्षीय विशाल नाईक हा किनाऱ्यावरील जलक्रीडा करणाऱ्या एका नौकेवर कामाला होता.

हार्बर कोस्टल पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रदीप वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (7 जानेवारी) दुपारच्या सुमारास पर्यटकांना आपल्या नौकेत घेऊन समुद्रात गेला होता. त्यानंतर तो समुद्रात अंघोळीसाठी उतरला.

खोल समुद्रात असलेल्या एका बेटाजवळ तो अंघोळ करत होता. बराच वेळ तो दिसला नाही म्हणून त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला असता काही अंतरावर तो तरंगताना दिसला.

त्यानंतर त्वरितच त्याला चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. विशाल नायक हा मूळचा मध्य प्रदेशमधील असून तो सध्या नेरूलमध्ये राहत होता. दरम्यान, घटनेचा पंचनामा करून मृतदेह मडगावच्या हॉस्पिसिओ रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, निरीक्षक प्रदीप वेळीप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT