Morjim News : ‘कुळ-मुंडकार’ कायद्यात बदल करा; सरकारला देणार निवेदन

Morjim News : पेडणे तालुका नागरिक समितीच्या बैठकीत ठराव
Morjim
Morjim Dainik Gomantak
Published on
Updated on

Morjim News : मोरजी, जमिनीचे कब्जेदार म्हणून नोंद असलेल्यांना मालक म्हणून सिद्ध करण्यास लावणारा बदल कुळ व मुंडकार कायद्यात करावा, असा ठराव धारगळ येथील कामपुरुष मंदिराच्या सभागृहामध्ये झालेल्या पेडणे तालुका नागरिक समितीच्या जागृती बैठकीत मंजूर करण्यात आला.

पेडणे तालुका नागरिक समितीतर्फे राज्यात जागृती बैठका घेण्यात येत आहेत. धारगळ येथे झालेल्या बैठकीस समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते. समितीचे ॲड. सदानंद वायंगणकर, उपाध्यक्ष व्यंकटेश नाईक, अध्यक्ष पुंडलिक धारगळकर व इतरांनी यावेळी मार्गदर्शन केले.

ॲड. सदानंद वायंगणकर यांनी यावेळी कुळ मुंडकारसंबंधी कायदे व त्यातील पोटकलम याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच पेडणे तालुका नागरिक समितीतर्फे राज्यातील तेराही तालुक्यामध्ये जागृती मोहीम राबवत असून कुळ मुंडकारांच्या सह्यांचे निवेदन तयार करून स्थानिक आमदार व सरकारला सादर केले जाईल.

कुळ मुंडकार कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात येईल. कब्जेदाराला आपण मालक असल्याचे सिद्ध करणे बंधनकारक करावे. तशी दुरुस्ती कायद्यात करावी. चाळीसही आमदारांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. अन्यथा कुळ मुंडकार विरोधात ठाकतील, असा इशारा वायंगणकर यांनी दिला.

माजी कायदामंत्री रमाकांत खलप यांनी तसा प्रस्ताव सरकारला दिला होता. त्याची अंमलबजावणी करावी, असेही वायंगणकर यांनी सांगितले.

समितीचे उपाध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी कायद्यानुसार मुंडकारांना घरासह तीनशे चौ. मीटर जागा मिळते, परंतु आज कुटुंब वाढले आहे.

त्यामुळे तीनशे चौ. मीटर जागा अपुरी पडते. तीनशे मीटर ऐवजी जर एका कुटुंबात तिघेजण भाऊ असतील तर त्यांना प्रत्येकी तीनशे चौ. मीटर जागा उपलब्ध करावी. तशी दुरुस्ती कायद्यात करावी, अशी मागणी केली.यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

...तोवर खटले नको

मुंडकार म्हणून सिद्ध करण्यासाठी किंवा त्या मुंडकाराला तीनशे चौ. मिटर जमीन देण्यास जमीनदार किंवा भाटकार तयार असतो. परंतु कुळ म्हणून सिद्ध करण्यास जमीनदार पुढे येत. जोपर्यंत कब्जेदार आपण मालक म्हणून सिद्ध करत नाही, तोवर एकाही कुळ मुंडकाराने न्यायालयात खटले घालू नयेत. असे आवाहन यावेळी या बैठकीत करण्यात आले.

Morjim
Goa Latest News: मुख्यमंत्री रोजगार योजनेत अनेक सुधारणा : उत्पन्नाची अट रद्द

१० कोमुनिदाद जागा गेल्या कुठे?

पेडणे तालुक्यात बारा कोमुनिदाद जमिनींची नोंद होती. त्यापैकी चोपडे आगरवाडा आणि इब्रामपूर या दोन कोमुनिदाद बाकी आहेत. इतर दहा कोमुनिदहदची जागा गेली कुठे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. तसेच या जमिनीचा शोध घेण्यात यावा अशी मागणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com