Viresh Borkar File Photo
गोवा

Water Shortage Problem: गावडोंगरी, खोतिगाववासीयांची पाण्यासाठी वणवण; वीरेश बोरकर आक्रमक

दैनिक गोमन्तक

Water Shortage Problem: गावडोंगरी येथील गावणे धरणासंबंधी ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे (आरजी) आमदार वीरेश बोरकर यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. गावडोंगरी आणि खोतिगाव येथील रहिवाशांना अक्षरश: नदीपात्रात खड्डे खणून करवंटीने पेयजल मिळवावे लागते ही शरमेची गोष्ट आहे, असे बोरकर यावेळी म्हणाले.

गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील कर्वे, झिल्तावाडी, नाणे, श्रीस्थळ, इंद्रावाडा या भागांमध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. आठवड्यातून फक्त एकच दिवस टॅंकरद्वारे तेही चारशे लिटर पाणी पुरवण्यात येते. गेले तीन महिने येथील रहिवासी वाहनांमधून गावणे धरणाचे पाणी आणत आहेत. येथील आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी गावणे धरणाच्या पाण्याचा चतुर्थीपूर्वी या भागात पुरवठा करावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

जमीन वादामुळे विलंब

यासंदर्भात सभापती रमेश तवडकर यांच्याशी संपर्क साधला असता, तीन टप्प्यांत गावणे धरणाचे पाणी पुरवण्यासाठी नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात दीड कोटी रुपये खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येईल. पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिनी घालण्यात आली आहे. कर्वे येथील काही रहिवाशांचा जमिनीसंदर्भात आक्षेप आहे. तो प्रश्‍न सुटावा, यासाठी उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

विधानसभेत आवाज उठवणार

राज्यातील डबल इंजिन सरकार गावडोंगरी व खोतिगाव पंचायत क्षेत्रातील टंचाईग्रस्त भागाला गावणे धरणाचे पाणी पुरविण्यात अपयशी ठरले आहे. यासंबंधी राज्य सरकारला ‘आरजी’तर्फे पत्र लिहून या प्रश्नावर आगामी विधानसभेत आवाज उठविण्यात येणार अाहे. हा प्रश्‍न सुटेपर्यंत स्वस्थ राहणार नाही, असे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. गावणे धरणाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT