Water Shortage  Dainik Gomantak
गोवा

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे वडबाग-उसगावात गोंधळ, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

Wadbag-Usgaon Water Problem: वडबाग-उसगाव येथील ग्रामस्थांना गेले चार दिवस पाण्याचा एकही थेंब मिळाला नसल्‍याने सध्‍या ‘पाण्यासाठी दाहीदिशा’ अशी त्‍यांची गत झाली आहे.

Manish Jadhav

पाळी: वडबाग-उसगाव येथील ग्रामस्थांना गेले चार दिवस पाण्याचा एकही थेंब मिळाला नसल्‍याने सध्‍या ‘पाण्यासाठी दाहीदिशा’ अशी त्‍यांची गत झाली आहे. त्‍यामुळे संतप्‍त महिलांनी स्थानिक पंचसदस्य मनीषा उसगावकर यांच्यासह गुरुवारी (6 डिसेंबर) दाग-फोंडा येथील पाणीपुरवठा खात्याच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.

दरम्यान, वडबाग-उसगाव येथील नागरिकांना (Citizens) यापूर्वी पाण्याचा पुरवठा व्यवस्थित व्हायचा. पण गेले काही दिवस पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. मागच्या चार दिवसांत तर नळाला पाण्याचा एकही थेंब नसल्याने गृहिणींची तारांबळ उडाली आहे. दूर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खात्याने याप्रकरणी त्वरित लक्ष घालून येथील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्‍न सोडवावा अशी मागणी यावेळी करण्‍यात आली.

म्हार्दोळमध्ये पाण्यासाठी वणवण

म्हार्दोळ-सीमेपाईण भागात तर गेल्या महिन्याभरापासून पाण्याचा अनियमित पुरवठा सुरु असून लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. घरात पाण्याची टंचाई असल्याने गृहिणी वैतागल्या असून संबंधित खात्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT