Water Shortage Problem mandrem Dainik Gomantak
गोवा

Mardol: अनियमित पाणीपुरवठ्यामुळे म्हार्दोळ भागात गोंधळ; लोकांची पाण्यासाठी वणवण

Mardol Water Problem: संबंधितांनी त्वरित लक्ष घालून येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मडकई: म्हार्दोळ भागात सध्या पाण्याची टंचाई भासत असून पाणीपुरवठ्यात सातत्य नसल्याने गृहिणींना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

म्हार्दोळ-सीमेपाईण भागात तर गेल्या महिन्याभरापासून पाण्याचा अनियमित पुरवठा असून लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बाहेर धो-धो पाऊस पडत असताना घरात पाण्याची टंचाई असल्याने गृहिणी वैतागल्या असून संबंधित खात्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.

गेल्या महिन्यापूर्वी या ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने त्यासंंबंधीची तक्रार स्थानिकांनी आमदार तथा राज्याचे कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याकडे केली होती. त्यावेळी स्वतः मंत्री गोविंद गावडे यांनी त्याची दखल घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी खात्याच्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन लोकांना दिलासा दिला होता.

आता पुन्हा एकदा पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. गेल्या रविवारी तर पूर्ण दिवस पाणीच नव्हते. उशिरा पाणी आले. बऱ्याचदा पाणी येते; पण त्याला दाब नसल्याने पाणी वरच्या मजल्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे संबंधितांनी त्वरित लक्ष घालून येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT