Goa Rain  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain : धुवाधांर पावसातही नळ कोरडे; बोर्डे -कुंभारवाडात ४ दिवसांपासून पाण्यासाठी वणवण

Water shortage : त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. असे एक गृहिणी राधिका मळगावकर यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, भर पावसात डिचोलीतील कुंभारवाडा-बोर्डे येथे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.

गेल्या चार दिवसांपासून कुंभारवाड्यावरील घरगुती नळ कोरडे पडले असून, या वाड्यावर पिण्याच्या पाण्यासाठी मारामारी झाली आहे. त्यामुळे विशेष करून गृहिणींचे अक्षरशः हाल होत आहेत.

दरम्यान, कुंभारवाड्यावरील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘साबांखा’च्या पाणी पुरवठा विभागाने आज (शुक्रवारी) दुरुस्तीकाम हाती घेतले होते. मात्र व्हॉल्वमधून ‘कारंजा’गत पाण्याचा फवारा बाहेर उडत असल्याने दुरुस्तीकामात व्यत्यय आला. कुंभारवाडा येथे अधूनमधून पाण्याची समस्या उद्भवत असते. नळ कोरडे पडले की, स्थानिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत असते.

कुंभारवाडा येथे पाण्याची समस्या निर्माण झाल्यानंतर पहिल्या दिवशी या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र त्यानंतर पाणी पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. असे एक गृहिणी राधिका मळगावकर यांनी सांगितले.

जवळपास विहिरी नसल्याने स्थानिकांना लांबच्या ठिकाणी असलेल्या विहिरीवर धाव घ्यावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गृहिणींना विहिरीवर पाठवणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे पाण्यासाठी विहिरींवर आम्हाला धाव घ्यावी लागते, असे स्थानिक आणि ज्येष्ठ नागरिक श्रीकृष्ण मळगावकर यांनी सांगितले.

नव्या जलवाहिनीनंतर समस्या सुटेल!

डिचोली शहरात पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जुनाट झाली आहे. शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येत आहे. एकदा काय नवीन जलवाहिन्या बदलण्याचे काम पूर्ण झाले, की शहरातील पाण्याची समस्या सुटेल, असा आशावाद आमदार डॉ. शेट्ये यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT