शोपियामधील दहशतवादी हल्ल्यात J&K पोलिसांचे ASI जखमी, दहशतवाद्यांचा शोध सुरु

दक्षिण काश्मीरमधील (South Kashmir) शोपियामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षक जखमी झाले.
South Kashmir
South KashmirDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण काश्मीरमधील (South Kashmir) शोपियामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षक जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. दहशतवाद्यांना (Terrorists) पकडण्यासाठी पोलीस (Police) आणि सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरु केली आहे. (Jammu And Kashmir Assistant Sub Inspector Shabbir Ahmed Injured In A Terrorist Attack In Shopian)

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील (Shopian District) अम्शीपोरा भागात तैनात असलेल्या जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) पोलिसांच्या एएसआयवर मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलीस जवान शब्बीर अहमद गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरुन पळून गेले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.

South Kashmir
उत्तर भारतातील बहुतांश भागात पावसाची शक्यता, फेब्रुवारीमध्ये राहील थंडी- IMD

तसेच, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एएसआय शब्बीर अहमद मुलगा गुलाम हसन वागे मशिदीतून नमाज पठन केल्यानंतर अम्शीपोरामधील त्यांच्या घराबाहेर आले असता अचानक दहशतवाद्यांनी हल्ला करुन त्यांना जखमी केले. या घटनेनंतर दहशतवादी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिवाय, जखमी शब्बीर अहमद वागे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शोपिया जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com