Water resource data hack in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या जलस्रोत खात्याची गोपनीय माहिती झाली हॅक

पुराशी संबंधित माहिती लीक; हॅकर्सची क्रिप्टो करन्सीची मागणी

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात हॅकर्सनी सरकारी वेबसाईटना लक्ष्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोव्याच्या जलस्रोत खात्याचा पुराशी संबंधित डाटा हॅक करण्यात आला आहे. सरकारच्या या महत्त्वाच्या खात्याची माहिती चोरणाऱ्या हॅकर्सनी क्रिप्टो करन्सीची मागणी केली आहे. याप्रकरणी अज्ञात हॅकरविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.(Water resource data hack in Goa)

गोव्यात एखादी सरकारी वेबसाईट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गोव्यातील जलस्त्रोत खात्याचा गोपनीय डेटा हॅकर्सच्या ताब्यात गेल्यामुळे सायबर गुन्हे शाखाही खडबडून जागी झाली आहे. हा हॅकर नेमका भारतामधून हॅकिंग करतोय की भारताबाहेरून याचा शोध सध्या सुरु असून क्रिप्टो करन्सीची मागणी केल्याने त्याला शोधण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. तसंच या खात्याची वेबसाईट हॅक झाली असेल तर अन्य महत्त्वाच्या खात्यांची वेबसाईटही हॅकर्सकडून लक्ष्य केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (Goa News)

दरम्यान गोव्यात हॅकिंगची ही काही पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांचं फेसबुक पेज पुन्हा एकदा हॅक करण्यात आलं होतं. सरदेसाई यांनी यासंदर्भात सायबर गुन्हे विभागात तक्रार दाखल केली आहे. या पूर्वीही एकदा सरदेसाई यांचा ट्विटर अकाऊंट असंच हॅक केलं होता.

कुणीतरी आपलं अधिकृत फेसबुक पेज हॅक करून त्यावरून लोकांना आक्षेपार्ह संदेश पाठविले असल्याचा खुलासा सरदेसाई यांनी केला होता. तसंच असे संदेश कुणाला पोहोचले असतील तर आपण त्यांची माफी मागतो असे सरदेसाई यांनी ट्विटमध्ये म्हटले होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

SCROLL FOR NEXT