Tillari Dam Dainik Gomantak
गोवा

Tillari Dam : तिलारीतून विसर्ग सुरु; उत्तर गोव्याला पूराचा धोका नाही

जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी याबाबतची माहिती दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

सतत सुरु असलेल्या पावसामुळे तिलारी धरणाचा पाणीसाठी इशारा पातळीजवळ पोचल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसे असले तरी उत्तर गोव्यात पुराची भीती नाही आहे. गोव्यात जेव्हा भरतीची वेळ असते तेव्हा तिलारीचे पाणी सोडले जात नाही अशी माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

शनिवारी तिलारी धरणातील पाणी साठ्याने सांडवा पातळी गाठल्याने सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. तो विसर्ग कमी प्रमाणात होता. मात्र, सोमवारी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली.

दरम्यान, सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने संबंधित नदीकाठच्या गावांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. उत्तर गोव्याला पुराचा धोका नसल्याची माहिती गोवा जलस्त्रोत खात्याकडून देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT