Dudhsagar Waterfall: दूधसागर परिसरात शुकशुकाट; 'त्या' व्हायरल व्हिडिओची पर्यटकांमध्ये दहशत

बंदीचा परिणाम : रेल्वे पोलिसांची खास गस्त
Goa Waterfall |dudhsagar waterfall
Goa Waterfall |dudhsagar waterfallDainik Gomantak
Published on
Updated on

Dudhsagar Waterfall: सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सतत वाहणारा दुधसागर धबधब्यावर बऱ्याच वर्षापासून पहिल्यांदाच बंदी घालण्यात आल्याने रविवार असूनही धबधब्यावर एकही पर्यटक फिरकला नाही. त्यामुळे या परिसरात शुकशुकाट पसरलेला होता. रेल्वे प्रशासन आणि वनखात्याने यासंदर्भात खास दक्षता घेतली.

गेल्या आठवड्यात शनिवार व रविवारी धबधबा पाहण्यासाठी अचानक पाच ते सहा हजार पर्यटक दूधसागर रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. रेल्वे पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली होती. रेल्वे रुळावर उभे असलेला शेकडो पर्यटकांचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. रेल्वे पोलिसांनी पर्यटकांना शिक्षाही केली होती.

या घटनेची चर्चा देशभर रंगली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पर्यटकांच्या संरक्षणाचा व हिताचा विचार करून दूधसागर धबधबा पाहण्यासाठी रेल्वे तसेच रेलमार्गावरून चालत जाणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाइचे आदेश काढले तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनीही यांसदर्भात नोटीस जारी केली. त्याचा परिणाम म्हणून रविवारी एकही पर्यटक धबधब्यावर फिरकला नाही.

Goa Waterfall |dudhsagar waterfall
Salcete News : ‘नगरनियोजन’मधील ‘2011 आरपी’ची फाईल गेली कुठे?

रेल्वे पोलिसांकडून वारंवार सूचना

कुळे, सोनावळी तसेच केसरलॉकपासून धबधब्यापर्यंत विविध ठिकाणी रेल्वे पोलीस, वनखात्याचे अधिकारी गस्त घालीत होते. तसेच रेल्वेतील प्रत्येक डब्यातही रेल्वे पोलिसांकडून माइक द्वारे दुधसागर धबधबा या ठिकाणी न उतरण्याच्या सूचनाही वारंवार देण्यात येत असल्याने एकही पर्यटक धबाधबा ठिकाणी उतरले नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

Goa Waterfall |dudhsagar waterfall
Mayem Vayangani Gramsabha: 'या' प्रश्नांवरून ग्रामसभा गाजली; सेझा कामगारांचा प्रश्नही चर्चेत

‘ट्रेकिंग’ लवकर सुरु करावे

जिल्हाधिकारी यांनी दुधसागरवर बंदी घातलेली आहे पण मोले भगवान महावीर अभयाअरण्यातून वन विभागाचे सर्व नियम पाळून दुधसागर धबधब्याच्या पायथ्याशी जाण्यास बंदी घातलेली नाही, तरी सुद्धा संबंधित वन विभागने अजूनपर्यंत ट्रेकींग चालु केले नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रेकींग लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com