Chandrakant Shetye Dainik Gomantak
गोवा

धुमासेत लवकरच जलप्रक्रिया प्रकल्प

डॉ. चंद्रकांत शेट्ये: पूरप्रतिबंधात्मक उपाययोजनाही राबविणार

दैनिक गोमन्तक

डिचोली: साळसह आजूबाजूच्या परिसरातील पाणी समस्या कायमची सोडविण्यासाठी मेणकूरे पंचायत क्षेत्रातील धुमासे पठारावरील नियोजित दहा एमएलडी क्षमतेच्या जल प्रकल्पाच्या कामाला लवकरच चालना देण्यात येणार आहे, अशी माहिती डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी देऊन, वर्षभरात हा प्रकल्प पूर्णत्वास येऊन कार्यान्वित होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.

साळ गावातील पाणी समस्या आणि पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी जलस्रोत खाते आणि तिळारी जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच साळ येथे एक बैठक घेतली.

पंचायत सभागृहात घेतलेल्या या बैठकीवेळी डब्ल्यूआरडीचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी, कार्यकारी अभियंता के. पी. नाईक, सहायक अभियंते श्री. पोकळे, तिळारी जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद कडाळकर या अधिकाऱ्यांसह जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, साळ गावचे सरपंच घन:श्याम राऊत, अन्य पंचसदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

धुमासे येथे जल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लाटंबार्सेतील नियोजित आयडीसीतील पाण्याची समस्या सुटणार आहे, असेही डॉ. शेट्ये यांनी सांगितले.

दरवर्षी पावसाळ्यात तुंबणारा साळ गावातील नाला मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जलस्रोत खात्यातर्फे उपसून देण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. शेट्ये यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT