Water Pipeline Burst in Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa : म्हापशात पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया

सध्या म्हापसा परिसरामध्ये पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापशातील एकतानगर तसेच गणेशपुरी हाऊसिंगबोर्ड परिसरामध्ये सध्या भूमीगत विजेच्या केबलिंगचे काम जोरदारपणे चालू आहे. आज मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे केबलिंगसाठी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरु होतं. हे खोदकाम सुरु असताना येथील पाण्याच्या पाईपला जेसीबीचा धक्का लागून मोठी पाईप फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले.

विजेच्या भूमिगत केबलिंगच्या खोदकामावेळी वेगवेगळ्या ठिकाणी अशाच जेसीबीमुळे पाण्याची पाईपलाईन फुटून पाणी वाया जाण्याचे प्रकार सध्या गोव्यात वाढले आहेत. म्हापसा परिसरामध्ये अशाच घडलेल्या घटनांमुळे लोकांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. यामुळे लोकांमध्ये नाराजी असून कंत्राटदाराच्या बेफिकिरीमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सध्या म्हापसा परिसरामध्ये पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली असतानाही पाईपलाईन फुटत असल्याने लोकांना मात्र पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.

मागच्या महिन्यात अशीच पाईपलाईन फुटून एकतानगर येथे पाणी वाया गेले होते. यातून हजारो लिटर पाणी वाहून गेल्याने या भागातील रहिवाशांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागला होता. आता आज मंगळवारी सकाळी पुन्हा मोठी पाईपलाईन फुटुन हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei Tiger Reserve: म्हादईत व्याघ्र प्रकल्प होणार का? CEC येणार गोव्यात; गोवा फाउंडेशन-वन अधिकाऱ्यांत खडाजंगी

Goa Live Updates: तिस्क-उसगाव येथे कार व बुलेट यांच्यात अपघात

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पात्रावचे बॅनर्स फाडण्याचा ‘प्रताप’

Goa: 'घर खरेदी गोमंतकीयांच्या आवाक्याबाहेर, दर 666% वाढले', राहुल देशपांडेंचे प्रतिपादन; ‘स्वयंपोषक विकास व गोवा’ सादरीकरण

Goa Road Closure: गोव्यातील 'हा' रस्ता राहणार बंद! प्रवाशांना बसणार मोठा फटका; पर्यायी मार्ग जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT