Salaulim Dam Dainik Gomantak
गोवा

राज्‍यातील धरणांतील पाणीसाठा वाढला

साळावली, तिळारी तुडुंब : परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

दैनिक गोमन्तक

पणजी : गेल्‍या काही दिवसांपासून राज्‍यातील बहुतांश धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्‍यातील साळावली धरणासह गोवा आणि महाराष्ट्राचा संयुक्‍त प्रकल्‍प असलेले तिळारी धरणही तुडुंब भरले असून, तिळारीतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गोवा आणि महाराष्ट्र सीमवेरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जलस्रोत खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार साळावली धरण 99 टक्‍के भरले असून, धरणात 23 हजार 160 हेक्‍टर मीटर पाणीसाठा झाला आहे; तर पाण्याची पातळी 41 मीटरपर्यंत पोचली आहे. तिळारी धरण 78 टक्‍के भरले असून, पाणीसाठा 35 हजार 895 हेक्‍टर मीटर इतका झाला आहे. तसेच पाण्याची पातळी 106 मीटरवर पोचली आहे. अंजुणे धरणातील पाणीसाठा 1 हजार ३६ हेक्‍टर मीटर झाला असून, धरण 76.12 टक्‍क्के भरले आहे; तर पाण्याची पातळी 76.12 मीटरवर पोचली आहे. हे धरण केवळ 23 टक्‍केच भरले आहे. चापोली धरणात 875.97 हेक्‍टर मीटर पाणी साठले असून, पाण्याची पातळी 36.15 मीटर इतकी झाली आहे. चापोली धरण सुमारे 78 टक्‍के भरले आहे.

आमठाणे धरणाची पाण्याची पातळी 48 मीटर इतकी झाली आहे. पाणीसाठा 432 हेक्‍टर मीटर झाला आहे; तर धरण सुमारे 72 टक्‍के भरले आहे. पंचवाडी धरणात 383.52 हेक्‍टर मीटर पाणीसाठा असून, पाण्याची पातळी 25.30 मीटरपर्यंत पोचली आहे. पंचवाडी धरण 78 टक्‍के भरले आहे. गावणे धरणात 155.90 हेक्‍टर मीटर पाणीसाठा आहे. त्याची पाण्याची पातळी 62.30 मीटरपर्यंत पोचली आहे. तसेच जलाशय 78 टक्‍के भरला आहे.

दरम्‍यान, धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने आपत्कालीन व्‍यवस्‍था सज्ज ठेवली आहे. स्‍थानिक मामलेदार, पोलिसांची पावसावर नजर असून, आवश्‍यक त्‍या ठिकाणांहून लोकांना सुरक्षित नेण्याचे काम सुरू आहे.

धरण क्षेत्रातील पाऊस

राज्‍यातील धरण क्षेत्रात आज मुसळधार पाऊस झाला. साळावली धरण क्षेत्रात आज शनिवारी चोवीस तासात सर्वाधिक म्‍हणजेच 1,599 मिमी पावसाची नोंद झाली; तर सर्वात कमी अंजुणे धरण क्षेत्रात 1,185.40 मिमी. पाऊस झाला. चापोली धरण क्षेत्रात 1,468.50 मिमी. पाऊस झाला; तर तिळारी धरण क्षेत्रात सुमारे 1,210.60 मिमी. इतका पाऊस झाला. अन्‍य धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण रात्री उशिरापर्यंत उपलब्‍ध झाले नव्‍हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 Opening Ceremony: 56व्या इफ्फीची दणक्यात सुरुवात, गोव्याच्या चित्ररथांची मिरवणूक ठरली सांस्कृतिक आणि कलात्मक पर्वणी

IFFI 2025: गोवा बनलं जागतिक सिनेमाचं घर, 56व्या 'IFFI'चं थाटात उद्घाटन; CM सावंतांनी सिनेप्रेमींना दिला 'येवकार'

Viral Video: कोरियन महिला खासदारानं गायलं 'वंदे मातरम', फिल्म बाजारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Goa Live News: IFFI 2025 मध्ये गोव्याची संस्कृती झळकणार; दोन गोमंतकीय चित्रपटांची Gala Premiere साठी निवड!

IND vs SA ODI Series: रोहित-विराट खेळणार, पण नेतृत्व बदलणार! वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियात होणार मोठा बदल; कोणाच्या गळ्यात पडणार कर्णधारपदाची माळ?

SCROLL FOR NEXT