Water in Mining Dump Dainik Gomantak
गोवा

धोकादायक खंदकांतील पाणी उद्यापासून उपसण्‍याची शक्‍यता

लामगाव खाणीवर पंप : मुख्‍यमंत्र्यांच्‍या वक्तव्‍यानंतर हालचाली

दैनिक गोमन्तक

डिचोली : लामगावच्या माथ्यावरील खंदक धोकादायक अवस्थेत आहे. या खाणीवर सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्यावी, अशी मागणी लामगावसह डिचोलीतील जनतेतून करण्‍यात येत आहे. खंदकांच्‍या सुरक्षेबाबत राज्य सरकार गंभीर असल्‍याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी साखळीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. त्यामुळे सोमवारपासून डिचोलीतील या धोकादायक खंदकातील पाण्याचा उपसा आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या खंदकात पाणी खेचणारे पंप असल्याचे दिसून येतात.

लामगावच्या माथ्यावर असलेले सेझा कंपनीचा हा खंदक दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. शनिवारी त्‍याची पाहणी केली असता, खंदकातील पाणी नियंत्रित असल्याचे दिसून आले. मात्र खाणीवरील मातीची दरड कोसळण्याच्या स्‍थितीत आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाअंतर्गत पावसाळा जवळ आला की संबंधित खाण कंपनीकडून सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

आधीच लामगावच्या माथ्यावरील खंदक धोकादायक अवस्थेत आहे त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि जवळ आलेला मोसमी पावसाळा यामुळे लामगावसह डिचोली शहरातील जनतेची धाकधूक वाढली आहे. या खंदकावर तातडीने उपाययोजना कराव्‍यात, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Balli Riots 2011: बाळ्ळी जाळपोळ प्रकरण! आठ वर्षानंतर संशयित बरकत अलीला सौदी अरेबियातून अटक

Pramod Sawant: गोव्यात पुन्हा धर्मांतर खपवून घेणार नाही; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा रोख नेमका कुणाकडे?

Margao Municipality: पाणी, वीजजोडणी आदेशांच्या नोंदीचा अभाव; पालिका अधिकाऱ्यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर!

Ponda Parking Problem: फोंड्यात पार्किंग समस्या जटिल! वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; कायदेशीर कारवाईची होतेय मागणी

Allu Arjun: गोव्यात खरंच दारु खरेदी केली का? सात वर्षानंतर सुपरस्टार अल्लु अर्जुनने सांगितले Viral Video मागील सत्य

SCROLL FOR NEXT