water hyacinth will be beneficial for agriculture, will be organic fertilizer production  Danik Gomantak
गोवा

घातक जलपर्णी ठरणार शेतीसाठी उपकारक, होणार जैविक खतनिर्मिती

घातक वनस्पतीच्या साहाय्याने जैविक खत निर्माण करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम

दैनिक गोमन्तक

म्हापसा : वर वर सुंदर वाटणारी ‘वॉटर हायसिंथ’ अथवा ‘रिवर हायसिंथ’ ही वनस्पती पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक असून, या वनस्पतीमुळे तार-म्हापसा येथील नदीतील मत्स्यधनावर परिणाम झाला आहे. असे असले, तरी या घातक वनस्पतीच्या साहाय्याने जैविक खत निर्माण करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम सध्या म्हापसा येथील सामाजिक कार्यकर्ता सलमान खान यांनी राबवला आहे. (water hyacinth will be beneficial for agriculture, will be organic fertilizer production)

अभियांत्रिकी क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून अर्थात वर्ष 2009 पासून स्वत: संशोधन करून ‘पॉवर टेक लॉजिक’ या कंपनीमार्फत ते शेतकऱ्यांना जैविक खतांचे वितरण करीत करीत आहेत. आता ‘वॉटर हायसिंथ’चा वापर करून ते ‘ग्रोव मोर’ हे नवीन उत्पादन बाजारपेठेत आणणार आहेत. त्यादृष्टीने त्यांनी स्वत:च्या आस्थापनामार्फत नानाविध प्रयोग सुरू केले आहेत.

या जलपर्णींवर गेल्या वर्षभरात संशोधन केले असून, त्याचा समाजाला उपद्रव होऊ नये यासाठी आगळीवेगळी उपाययोजना शोधली आहे, असाही त्यांचा दावा आहे. यासंदर्भात मी प्रयोग केला असून, असे खत कोणताही नफा न कमावता केवळ उत्पादन खर्च वसूल करून शेतकऱ्यांना देण्याचा माझा विचार आहे. या जलपर्णीचा खतासाठी वापर होऊ शकतो. त्यायोगे नदीतील जलचरांना होणारा उपद्रवही कमी होऊ शकतो, असेही खान यांनी स्पष्ट केले.

- पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटले

तार नदीतील पाण्यावर गेल्या काही वर्षांपासून जलपर्णी मोठ्या प्रमाणात सर्वत्र फैलावली आहे. त्यामुळे पाण्यातील मत्स्यजीव व अन्य विविध जीवजंतूंचे आयुष्य संपुष्टात येत आहे. तसेच पाण्याचा दर्जाही खालावत चालला आहे. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण जलपर्णींमुळे अतिशय कमी झाल्यानेच हे मत्स्यजीव दगावतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

घातक जलपर्णीचे विविध उपयोग...

(1) ‘वॉटर हायसिंथ’ ही घातक वनस्पती सेंद्रिय खत म्हणून वापरता येते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले ‘एनपीके नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम’चा वापर शेती व्यवसायासाठी केला जाऊ शकतो.

(2) या प्रक्रियेत आम्ही बायोगॅसची निर्मिती करणार आहोत. त्याचा वापर वीजनिर्मितीसाठी तसेच घरगुती खाद्यपदार्थ शिजवण्यासाठी केला जाऊ शकतो.

(3) पोल्ट्री फार्ममध्येसुद्धा ही वनस्पती वापरता येते; ज्यायोगे कोंबड्यांसाठी ते चांगल्यापैकी खाद्य होऊ शकते. त्यामुळे पोल्ट्रीमधील नियमित खर्चिक खाद्याचा वापर कमी होऊन या नवीन माध्यमातून अंड्यांचा दर्जाही वाढेल.

(4) बकरी आणि डुकरांसाठी ही वनस्पती खाद्य म्हणून वापरता येते.

(5) ‘इथेनॉल’च्या स्वरूपात ‘बायो-फ्युएल’ (जैविक इंधन) म्हणूनही या वनस्पतीचे रूपांतर करता येते व त्याचा वापर जेवण शिजवण्यासाठी करणे शक्य आहे. सध्याच्या घडीस इंधनाचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हा नवीन पर्याय ठरू शकतो. लाकूड व कोळसा जाळताना निर्माण होणारा धूर या पद्धतीत जाणवणार नाही.

पर्यावरणाला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत ही नवीन संशोधनपर उपाययोजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे. यासंदर्भात सुयोग्य तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर कचरारूपी धोकादायक वनस्पतीचे रूपांतर संपत्तीत करून ती समस्या कायमची सोडवता येईल. त्याचा लाभ आपल्या देशाला तसेच अर्थव्यवस्थेलाही होणार आहे. अस मत सामाजिक कार्यकर्ते सलमान खान यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT