म्‍हापसा मासळी मार्केटची आरोग्य केंद्राकडून पाहणी; उपाययोजनेबाबत पालिकेला निर्देश

पावसाळ्‍यात समस्‍या होऊ शकते गंभीर
Mapusa Fish Market
Mapusa Fish MarketDainik Gomantak

म्हापसा : सामाजिक कार्यकर्ते प्रवीण आसोलकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर म्हापसा येथील मासळी मार्केट व सभोवतालच्या परिसराची म्हापसा पालिका व नागरी आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. परिसरात पाणी साचून रोगराई पसरणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना घेण्याचे निर्देश यावेळी आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पालिकेला दिले. (Health center inspects Mapusa fish market)

यावेळी शहरातील आरोग्य अधिकारी डॉ. शॅरल डिसोझा, स्वच्छता अधिकारी उदय ताम्हणकर, स्थानिक नगरसेवक सुधीर कांदोळकर तसेच पालिकेचे पर्यवेक्षक उपस्थित होते. नागरी आरोग्य केंद्राने पालिकेला नाला साफ करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून तिथे पाणी साचू नये. कारण हे ठिकाण डास पैदासीचे केंद्र बनू शकते. आता पावसाळा येणार आहे. अशा वेळी कंटेनर्स आणि इतर सामान रिकामे करण्याचा पालिकेला आम्ही या आधीच सल्ला दिला आहे, असेही केंद्राच्या अन्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Mapusa Fish Market
मडगाव परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

तक्रारदार प्रवीण आसोलकर यांनी दावा केला आहे की. आपण पालिकेसह विविध यंत्रणांशी पत्रव्यवहार केला. परंतु या संयुक्त पाहणीवेळी पालिकेतर्फे साधा कनिष्ठ अभियंताही न पाठवता केवळ सोपस्कार म्हणून पर्यवेक्षकालाच पाठवण्यात आले. यावरून या विषयाबाबत पालिकेची उदासीनता दिसून येते.

पावसाळ्‍यात समस्‍या होऊ शकते गंभीर

या पाहणीदरम्‍यान मासळी मार्केट आणि आजूबाजूला दूषित पाणी साचले असल्‍याचे व ते डासांच्या पैदासीला कारणीभूत ठरू शकते असे आढळून आले आहे. या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यास आणि सांडपाणी साचणार नाही याची काळजी घेण्यास म्‍हापसा पालिकेला सांगण्‍यात आले आहे. शिवाय तेथील नाल्यात पाणी साचून राहत असल्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते, असे शहरातील आरोग्य अधिकारी डॉ. शॅरल डिसोझा यांनी सांगितले.

या संयुक्त पाहणीवेळी लक्षात आले आहे की, एका बाजूला मासळी क्रेट्स टाकले जाताहेत आणि त्यात पाणी साचत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम केवळ मासळीविक्रेत्यांवरच नाही तर बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांवरही होणार आहे. पालिकेने याबाबत गांभीर्य दाखवून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com