Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Water Dispute: डोंगुर्लीत पाण्यासाठी वणवण

कार्यालयावर धडक : नळाद्वारे अनियमित आणि गढूळ पाणीपुरवठा

गोमन्तक डिजिटल टीम

Water Dispute सत्तरी तालुक्यातील पर्ये मतदारसंघामधील डोंगुर्ली गावात गेल्या तीन महिन्यांपासून अनियमित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्‍यामुळे ग्रामस्‍थ विशेषत: महिला त्रस्त बनल्या आहेत. शेवटी आज गुरुवारी संतप्त महिलांनी वाळपई पाणीपुरवठा विभाग कार्यालयावर धडक दिली.

परंतु साहाय्यक अभियंत्‍याची भेट झाली नाही. त्‍यामुळे तेथे उपस्‍थित कर्मचारी वर्गाकडे महिलांनी कैफियत मांडली आणि पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी लावून धरली. यावेळी सत्तरी जलसंपदा अधिकारिणी मंचचे रामनाथ वरक, भैरू वरक हेसुद्धा उपस्थित होते.

डोंगुर्ली गावात सुमारे 20 घरे असून गेल्‍या तीन महिन्‍यांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. शिवाय जलवाहिनीद्वारे पुरविले जाणारे पाणी खूपच गढूळ असते. हे पाणी आम्‍ही असे प्‍यावे? असा सवाल मंजली गावकर यांनी उपस्‍थित केला. टँकरने पाणीपुरवठा केला जातो, पण तीन-चार दिवसांनी एकदा.

रस्त्यालगत असलेल्या घरांना टँकरचे पाणी मिळते. पण उर्वरित घरे पाण्‍याविना राहतात, असेही गावकर यांनी सांगितले. याबाबत पाणीपुरवठा कार्यालयाला कल्‍पना देण्‍यात आली, पण त्यावर अजून तरी काहीच कार्यवाही झालली नाही, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

सत्तरी जलसंपदा मंचचे रामनाथ वरक यांनी सांगितले की, मंचतर्फे आम्‍ही गावात सर्व्हे करीत आहोत. लोकांच्या गाठीभेटी घेऊन पाणी किती वेळ मिळते, कधी मिळते याबाबत माहिती जाणून घेत आहोत.

उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत सरपंचांनी सांगितले होते की, सत्तरीत कुठेच पाणी समस्या नाही. तर मग डोंगुर्ली गावच्या महिलांना पाण्यासाठी कार्यालयात खेपा का माराव्या लागतात?

कित्‍येक दिवसांपासून बोअरवेल नादुरुस्‍त

डोंगुर्ली गावात बोअरवेल आहे. पण ती स्वच्छ करण्‍यात आलेली नाही. तिचा पंप नादुरुस्त आहे. बोअरवेल नवीन बांधण्याची गरज आहे, असे माधवी च्यारी यांनी सांगितले. तर, संजना दाबेकर म्हणाल्या, पाण्‍याच्‍या समस्‍येमुळे आम्‍ही हैराण झालो आहोत. कार्यालयातील कर्मचारी याबाबत काहीच बोलत नाही.

अभियंत्‍यांना विचारा, असे त्‍यांच्‍याकडून उत्तर मिळते. दरम्‍यान, यावेळी महिलांनी बाटलीत भरलेले गढूळ पाणी दाखविले.

डोंगुर्लीच्या मंजली गावकर, अश्विनी गावकर, माधवी च्यारी, संजना दाबेकर, संजीवनी गावकर, रितिका गावकर, उज्‍ज्वला गावकर, पूजा गावकर, दीप्ती दाबेकर, अंकिता गावकर आणि अन्‍य महिलांची यावेळी मोठ्या संख्‍येने उपस्‍थिती होती.

गावात टँकरने पाणीपुरवठा केला जातो, पण तीन-चार दिवसांनी एकदाच. रस्त्यालगत असलेल्या घरांना टँकरचे पाणी मिळते. पण उर्वरित घरे पाण्‍याविना राहतात. या लोकांनी काय करावे? याबाबत पाणीपुरवठा कार्यालयाला कल्‍पना देण्‍यात आली आहे, पण त्यावर अजून तरी काहीच कार्यवाही झालेली नाही.

- मंजली गावकर, ग्रामस्‍थ

आम्ही मंचतर्फे सत्तरीत पाण्‍याच्‍या समस्येबाबत आवाज उठविणार आहोत. अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटून पाण्याची नासाडी होत असते. ही बाब अभियंत्‍यांच्‍या निदर्शनास आणून देऊन दुरुस्तीसाठी पाठपुरावा करणार आहोत. सत्तरी तालुक्यात आजही लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

- रामनाथ वरक, सत्तरी जलसंपदा अधिकारिणी मंचचे सदस्‍य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT