Margao News: खासदार सार्दिन यांच्या कृतीचा सर्व स्तरांतून निषेध

कारवाईची मागणी : दिव्यांग लाभार्थ्याला दिली अपमानजनक वागणूक
Francis Sardine
Francis SardineDainik Gomantak
Published on
Updated on

Margao News: कार्यक्रमास हजेरी लावण्यास फक्त 10 मिनिटे उशीर झाला म्हणून एका दिव्यांग लाभार्थीला अपमानजनक वागणूक देत त्याला तीनचाकी गाडी न देता परत पाठविण्याच्या दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या कृतीचा सर्व थरातून निषेध होत आहे.

दिव्यांग आयोगाने या घटनेची त्वरित दखल घेत सार्दिन यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोझा यांनी केली आहे.

ही घटना काल घडली होती. खासदार निधी योजनेतून चार दिव्यांगांना तीनचाकी गाड्या देण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. असोळणा येथील एका दिव्यांग लाभार्थीला या कार्यक्रमास पोहोचण्यास फक्त 10 मिनिटे उशीर झाला. दिलेल्या वेळेवर न आल्याने सार्दिन यांनी त्याला गाडी न देता पुढच्या रविवारी कुडतरी तेथे होणाऱ्या कार्यक्रमास येऊन गाडी घेऊन जा, असे सुनावले.

Francis Sardine
Goa Shigmotsav 2023: बोर्डेतील घोडेमोडणी जल्लोषात

भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सार्दिन यांच्या या कृतीचा निषेध करत सार्दिन यांनी त्या लाभार्थीची माफी मागून ती तीनचाकी त्याच्याकडे विनाविलंब पोहोचती करावी, अशी मागणी केली आहे. तर माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी या घटनेचा निषेध करताना स्वतः वक्तशीर असणे म्हणजे दुसऱ्यांचा अपमान करण्यासाठी दिलेला परवाना नव्हे, असे म्हटले आहे.

Francis Sardine
Goa Accident Death: गोव्याला अपघातांचे ग्रहण! म्हापश्यातील अपघातात एकजण जागीच ठार

याबाबत तक्रार करणार-

हा तर शुद्ध उद्धटपणा असून आपण या घटनेची तक्रार दिव्यांग आयोग आणि मानवाधिकार आयोगाकडे करणार आहे. एका लाभार्थीला अपमानजनक वागणूक देण्यासाठी खासदार आपल्या पैशांतून या गाड्या देत नाहीत तर जनतेच्या पैशांतून ही योजना राबविली जाते, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे ॲंथनी बार्बोझा यांनी या घटनेचा निषेध करताना सांगितले.

Francis Sardine
Wildfires in Mhadai Sanctuary: बिनबुडाचे वनखाते

वेळेचे महत्त्व सर्वांना कळायला हवे. या लाभार्थींना गाड्या मिळाव्या यासाठी मी स्वतः पणजीहून वेळेत मडगावला पोहोचलो. त्या लाभार्थीला फक्त दहा मिनिटे नव्हे तर अर्धा तास उशीर झाला होता. दुसऱ्यांच्या वेळेलाही महत्त्व दिले पाहिजे ते त्याला कळावे यासाठीच मी त्याला रविवारी येऊन त्याची गाडी घेऊन जा, असे सांगितले आहे.

- फ्रान्सिस सार्दिन, दक्षिण गोवा खासदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com