coastal taxi ban Goa Dainik Gomantak
गोवा

Warren Alemao: किनारपट्टीवर खासगी टॅक्सीबंदीचा इशारा; "खऱ्या आरोपीला पकडा" वॉरन आलेमाव यांचा अल्टिमेटम

Private Taxi Controversy: वार्का प्रकरणात खऱ्या आरोपीला अटक करा किंवा ज्यांनी तक्रार नोंदवली त्यांची चौकशी करा, तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहील

Akshata Chhatre

मडगाव: किनारी भागात खासगी टॅक्सी चालकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात येणार आहे. वार्का प्रकरणात खऱ्या आरोपीला अटक करा किंवा ज्यांनी तक्रार नोंदवली त्यांची चौकशी करा, तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहील आणि दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असा थेट इशारा बाणावलीचे सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी दिलाय.

वार्का येथे एका पर्यटकाला टॅक्सी चालकाने अडवून पैसे घेतल्याचा आरोप केला होता यानंतर कोलवा पोलीस स्थानकात स्थानिक टॅक्सी चालकांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली. 

मडगावातून येणाऱ्या काही टॅक्सी चालकांकडे वैध व्यापर परवाने नाही. ते कर भरत नाहीत, त्याच्याजवळ कार्यालय नाही, त्यांनी हॉटेल्ससोबत करार केलेला नाही तरीही ते अ‍ॅपबेस टॅक्सी चालक असल्याचं सांगत पर्यटकांना फसवत आहेत.

दुसऱ्या बाजूला स्थानिक टॅक्सी चालकांसाठी टॅक्सी चालवणं हेच त्याच्या उदरनिर्वाहाचा एकमेव साधन आहे. त्यांनी कर्ज काढून या टॅक्सी विकत घेतल्यात आणि अशा लोकांचा व्यवसाय हिसकवून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच लढा देऊ असं कार्यकर्ते वॉरन आलेमाव म्हणालेत. 

टॅक्सी चालकांच्या बदनामीचा प्रयत्न!!

स्थानिक टॅक्सी चालक हेच नीज गोयेंकर आहेत, त्याच्या कुटुंबीयांचा उदार्निर्वह या व्यवसायावर चालतो. हे टॅक्सी माफिया नाहीत तरीही त्याच्यावर खंडणी मागितल्याचा खोटा आरोप करण्यात आलाय. कोलवा पोलिसांनी हॉटेलमधले सीसीटीव्ही तपासून पहावेत हा केवळ स्थानिक टॅक्सी चालकांना अडकवण्याचा डाव आहे कोणीही असे पैसे घेतलेले नाहीत असं कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी सांगितलं आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pernem Malpe: चालकाला टॅक्सीतून बाहेर काढले, धारदार शस्त्रांनी केला हल्ला; पेडणे प्रकरणातील तिघे संशयित ताब्यात

Govind Gaude: गोविंद गावडेंचे सरकारवर शरसंधान! अर्थसंकल्प, समाजकल्याण खात्याबद्दल केले मतप्रदर्शन

POP Ganesh Idol: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर गोव्यात बंदी! चित्रशाळांची होणार संयुक्त तपासणी; कडक कारवाईचे निर्देश

Tillari Canal: तिळारी कालव्‍यांची स्‍वच्‍छता, लायनिंगची कामे होणार! विधानसभेत जलस्रोतमंत्री शिरोडकरांची हमी

Canacona Raid: घरात चालायचा 'जुगार' अड्डा! कर्नाटकातील 40 संशयितांच्या मुसक्या आवळल्या; काणकोणात 16 लाखांचा ऐवज जप्‍त

SCROLL FOR NEXT