Rain in Goa | Goa Weather Updates Dainik Gomantak
गोवा

येत्या तीन दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असल्याने सावधानतेचा इशारा

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात 23, 24 आणि 25 जून रोजी सर्वत्र मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. राज्यात मान्सून सक्रिय असल्याने सर्वत्र समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहणार असल्याने सावधानतेचा इशारा दिला आहे. (warning of heavy rains in the next 3 days in goa )

राज्यात गेल्या 24 तासात सरासरी 56.6 मिमी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस काणकोणमध्ये 121.4 मिमी., केपेमध्ये 110 मिमी., पेडणे 70.8 मिमी., मडगाव येथे 58.2 मिमी., दाबोळी येथे 57.6 मिमी., पणजी येथे 41.6 मिमी., सांगे 49.5 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. या हंगामात आतापर्यंत सर्वांत जास्त पाऊस पेडणे येथे 614 मिमी. झाला आहे.

गोव्यात लवकरच अत्याधुनिक फेरी बोट

गोवा राज्‍यातील फेरी जलमार्गांमध्ये सुधारणा करण्याच्या हेतुने नदी परिवहन खाते अग्रेसर असून, लवकरच दोन नवीन अत्याधुनिक फेरी बोट्स खात्याच्या ताफ्यात जोडल्या जाणार आहेत. एकूण 1.8 कोटी रुपये किंमत असलेल्या फेरी बोट्स यावर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत ताफ्यात जोडल्या जाणार असल्याची माहिती नदी परिवहन खात्याचे अधीक्षक विक्रम राजे भोसले यांनी दिली आहे.

नवीन फेरी बोट्स अत्याधुनिक असणार असून इतरांच्या तुलनेत त्या आकारात मोठ्या असणार आहेत. तसेच त्यांना डबल म्हणजे दोन इंजिन असल्याने, त्यामुळे त्यांची गती देखील जास्‍त असणार आहे. सामान्य फेरी बोट 6 ते 7 नॉट्सच्या वेगाना धावतात. परंतु, या 9 नॉट्सच्या वेगाने धावणार आहेत, असे राजे भोसले यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, फेरीचा रँप हा हायड्रॉलिक असणार असून यंत्राद्वारे हा वर आणि खाली केला जाईल. त्याशिवाय फेरीच्‍या कप्तानचे कॅबिन हे एअर कंडिशन्ड असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT