मडगाव: मुरगाव, दाबोळी, कुठ्ठाळी या तीन मतदारसंघातील ‘जनमन उत्सव’ सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर आजपासून वास्को मतदारसंघात हे सर्वेक्षण सुरू झाले असून, आज सासमोळे येथील महिलांनी या उपक्रमाचे जंगी स्वागत केले. या उत्सवाला महिलांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे.
सासमोळे येथे सर्व थरातील महिला या सर्वेक्षनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. त्यात येथील अंगणवाडीच्या सहाय्यक महिलेचाही समावेश होता. युवा गृहिणीही या उपक्रमात सहभागी झाल्या. या उपक्रमाद्वारे गोमंतक महिलांची मते जाणून घेत असून त्यांना अपेक्षित असलेला गोवा कसा साकारता येऊ शकेल याची भविष्यात योजना बनविली जाणार आहे. गोव्यातील एकूण ३ लाख महिलांची मते आजमावून हा आराखडा तयार केला जाणार आहे.
दरम्यान, कुंकळ्ळी मतदारसंघात हे सर्वेक्षण सुरू असून, आज देमानी येथील महिलांनी त्यात भाग घेतला. सासष्टीत आतापर्यंत मडगाव, फातोर्डा, कुडतरी आणि नावेली या चार मतदारसंघात हे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.