Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

ड्रग्सप्रकरणातील वॉल्‍टरचे पोलिसाच्या फार्महाऊसमध्ये वास्तव्य? राजकीय व्यक्तींशीही जवळीक; तपासातून धक्कादायक बाबी उघड

Walter Fernandes Drugs Case: वॉल्टरने काणकोण तालुक्यात चांगलेच आर्थिक बस्तान बसवले होते. काणकोण येथे त्याची तीन रेस्टॉरंट्स सुरू असून, आत्तापर्यंत त्याने मोठी संपत्ती गोळा केल्याची माहिती समोर आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: वॉल्टर फर्नांडिस हा गेल्या २५ वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास असून, एका विदेशी महिलेसोबत घरोबा करून काणकोण तालुक्यातून ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क हाताळत असल्याचे गंभीर वास्तव उघडकीस आले आहे. ही विदेशी महिला ‘ओसीआय’ कार्डधारक असून, ती या अमली पदार्थ प्रकरणात गुंतलेली असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे तीसुद्धा सध्या पोलिसांच्या रडारवर आली आहे.

वॉल्टरने काणकोण तालुक्यात चांगलेच आर्थिक बस्तान बसवले होते. काणकोण येथे त्याची तीन रेस्टॉरंट्स सुरू असून, आत्तापर्यंत त्याने मोठी संपत्ती गोळा केल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलिस यंत्रणा व काही राजकीय व्यक्तींशी त्याची जवळीक असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, एका पोलिस अधिकाऱ्याच्या फार्महाऊसमध्येच वॉल्टर वास्तव्यास होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलिस यंत्रणेतील काही घटकांची संशयास्पद भूमिका देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

एकेकाळी देशी-विदेशी पर्यटकांचे नंदनवन म्हणून ओळखली जाणारी काणकोण तालुक्यातील किनारपट्टी आता ड्रग्‍समाफियांच्या विळख्यात सापडल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. कालच नायजेरियन नागरिक असलेल्या ओनेयेचोले फ्रायडे याच्याकडून तब्बल १ कोटी ९ लाख ९५ हजार रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले होते.

काणकोणातील अलीकडील ड्रग्स कारवाया

१९ जानेवारी, मूळ उत्तर प्रदेश येथील दीपू सिंग याला अटक. त्‍याच्‍याकडून ४ लाख ३१ हजार रुपये किमतीची चरस जप्त. २३ जानेवारी रोजी केरळ येथील अरुण के. एम. याला अटक. त्‍याच्‍याकडून १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा एमडीएमए जप्त. त्यानंतर वॉल्टर फर्नांडिस व ओनेयेचोले फ्रायडे यांच्यावर कारवाई.

सुमितला जामीन; फ्रायडेला कोठडी

वॉल्टरकडून सेवनासाठी ड्रग्स घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुमित बांदेकर (३२) या युवकाला काणकोण प्रथमवर्ग न्यायालयाने गुरुवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, कोकेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ओनेयेचोले फ्रायडे याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT