Wade Pond Water Dainik Gomantak
गोवा

वाडे तळ्यातील पाणी दूषित; मासे मृतावस्थेत

परिसरात दुर्गंधी: तातडीने उपाययोजना आखण्याची रहिवाशांची मागणी

दैनिक गोमन्तक

वास्को: राज्य नगर विकास संस्था (सुडा) तर्फे बांधण्यात आलेले वास्को वाडे येथील तळे दूषित झाल्याने मासे मरून पडण्याचा प्रकार घडला आहे. तळ्यातील पाणी दूषित झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. संबंधित विभागाने या प्रकरणी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. वाडे तळ्यातील पाण्याचा समुद्रात योग्यरित्या प्रवाहित होत नसल्याने तळ्यातील मासे मरू लागल्याची माहिती ‘गोवा फर्स्ट’चे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांनी दिली.

वास्को मुरगाव पालिकेच्या प्रभाग 24 मधील वाडे लेकचे सौंदर्यीकरण राज्य नगर विकास संस्था (सुडा) तर्फे करण्यात आले होते. संपूर्ण तळ्याचे सुडातर्फे चांगल्याप्रकारे सौंदर्यीकरण करण्यात आले असले तरी, तळ्यातील पाण्याचा समुद्रात योग्यरित्या प्रवाहित होत नसल्याने तळ्यातील माशांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यातील पाणी पूर्णपणे दूषित झाल्याने मासे मृतावस्थेत आढळण्याच्या प्रकारात वाढ होऊ लागली आहे.

दरम्यान, वास्को वाडे तळ्यातील पाणी दूषित होण्यामागे मुख्य कारण म्हणजे तळाच्या बाजूस इमारतीतील सांडपाणी तळ्यात जात असल्याने, तसेच तळ्यातील पाणी समुद्रात योग्यरीत्या जात नसल्याने संपूर्ण तळ्यात विचित्र प्रकारचे शेवाळ निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी स्थानिक रहिवाशांनी यंत्राद्वारे काही प्रमाणात शेवाळ तळ्यातून काढले होते. त्यावेळीही तळ्यामध्ये पाणी दूषित होऊन मासे मरू लागले होते. सदर याविषयी बिगर सरकारी संस्था ‘गोवा फर्स्ट’चे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांनी सांगितले, की तळ्याचे सौंदर्यीकरण करताना ‘सुडा’ने तळ्याचे पाणी समुद्रात जाण्यास नाल्याचे रुंदीकरण कमी केल्याने पाणी दूषित होण्याचे कारण सांगितले.

सदर सुडाने पुन्हा एकदा वाडे तळ्याची पाहणी करून नाल्याची रुंदी पुन्हा जैसे थे त्या प्रकारे करावी, अन्यथा तळ्यातील जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रकार घडत राहतील, अशी माहिती सोनुर्लेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डोकं चालवा 50,000 जिंका! AI आणि APP निर्मितीत तुम्ही मास्टर असाल तर गोवा पोलिस घेऊन आलंय मोठी स्पर्धा; लगेच सहभाग नोंदवा

Arpora: 'वैयक्तिक स्वार्थासाठी देवस्थानला धक्का लावू नका'! रस्ता सुशोभीकरणावरून हडफडेत वाद! ग्रामस्थांकडून हल्लाबोल

Mapusa: म्हापसा पालिकेच्या कारवाईवरून गोंधळ; हिंदूंना लक्ष्य केल्याचा आरोप; संघटना, दुकानदार आक्रमक

गोमंतकीयांसाठी खास पर्वणी! प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्तींचा गोवा दौरा, वाचा सविस्तर माहिती

Margao: '..पुन्हा परीक्षा घ्या, अन्यथा नगरपालिकेचे काम रोखू'! मडगाव कर्मचारी भरती परीक्षेवरुन काँग्रेस, NSUI आक्रमक

SCROLL FOR NEXT