Goa Panchayat Election 2022
Goa Panchayat Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election : गोव्यात मतदानाचा टक्का घसरला

दैनिक गोमन्तक

Goa Panchayat Election : पावसाळा आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणामुळे राज्य सरकारच्या वतीने पुढे ढकलण्यात येणारी ग्रामपंचायत निवडणूक उच्च न्यायालयाच्या बडग्यामुळे अखेर बुधवारी पार पडली. राज्यात 78.80 टक्के मतदान झाले. ही टक्केवारी पाहता पावसाळ्याचा मुद्दा गौण ठरला आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे समोर आले आहे. 2017 साली झालेल्या पंचायत निवडणुकीसाठी 80.33 टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र हा टक्का घसरला आहे.

राज्यातील 186 पंचायतींच्या 1464 प्रभागांसाठी सकाळी 8 तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार राज्यात 78.80 टक्के मतदान झाले. उत्तर गोव्यामध्ये 81.45 टक्के तर दक्षिण गोव्यामध्ये 76.13 टक्के मतदान झाले. राज्यात सर्वत्र झालेले मतदान शांततेत झाले असून अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वीच 64 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

कळंगुट प्रभाग 9 मध्ये मतदान स्थगित

कळंगुट पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधील खोब्रावडो येथील मतदान प्रकिया स्थगित केली गेली. मतपत्रिकेवरील चिन्हे आणि उमेदवारांची नावे जुळत नसल्याची माहिती एका उमेदवाराने दिल्याने हा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी सकाळी 8 ते 5 या वेळेत प्रभागासाठी निवडणूक होणार आहे. सदर घटनेविषयी जिल्‍हाधिकाऱ्यांनी चौकशीचा अहवाल तयार केला असून तो आयोगाला सादर केला आहे.

मुख्यमंत्री सावंतांच्या बंगल्यावर स्टेजची तयारी...

आता सर्वांच्या नजरा 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निकालाकडे लागल्या असून उत्सुकता शिगेला पोचली आहे. ग्रामीण भागात तर कोण निवडून येणार? यावरून अनेक ठिकाणी पैजा लागल्या आहेत, तर सत्ताधारी भाजपाने आपले सर्वाधिक समर्थक निवडून येतील असा दावा ठोकला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारी बंगल्यावर निवडून येणाऱ्या समर्थकांसाठी स्टेज उभारणीच्या कामाला सुरवात झाली आहे.

मतदानाची गुप्तता राहिली कुठे?

राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने दिव्यांग असलेल्या मतदारांना ब्रेल लिपीतून मतदानाची सुविधा होती. परंतु पंचायत निवडणुकीत सहाय्यकाद्वारे मतदान केल्याने आपल्या मताची गुप्तता राहिली नसल्याची खंत दिव्यांग शंकर कवठणकर यांनी व्यक्त केली. चिखली ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रभाग 4 चे मतदार कवठणकर म्हणाले, ब्रेलच्या सहाय्याने केलेल्या मतदान स्वतःहून करता येऊन मतदानाची गुप्तता कायम राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Due To Fasting: निर्जळी उपवास बेतला जीवावर, फोंड्यात बिहारच्या युवतीचा मृत्यू

Savoi Verem : निशानने धाग्यातून टिपला ‘द ग्लो ऑफ आई लईराई’;सावईवेरेतील युवा कलाकाराची कलाकृती

Goa Today's Live News: सांताक्रुज ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप सावंत

Arunachal Pradesh Crime: अरुणाचल प्रदेशात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 8 अधिकारी आणि पोलिसांसह 21 जणांना अटक

Digilocker Result : ‘डिजिलॉकर’वर निकाल देणारे गोवा दुसरे राज्य

SCROLL FOR NEXT