Cujira School Complex Dainik Gomantak
गोवा

कुजिरा संकुलाकडे विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवक नेमणार

कुजिरा संकुल वाहतूक कोंडीची दखल, महासंचालकांनी दिली भेट

दैनिक गोमन्तक

पणजी : कुजिरा संकुल येथील शिक्षण संस्थांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीची दखल घेत पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी भेट देऊन वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली.

या ठिकाणी त्यांनी वाहतूक नियमांचे फलक लावण्याबरोबरच वाहने घेऊन येणाऱ्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक तैनात करण्याचे तसेच विद्यार्थ्यांना रस्त्याच्या बाजूने चालण्यासाठी पदपथ उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या.

गेल्या सोमवारपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून कुजिरा संकुल येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाहनातून घेऊन येणाऱ्या पालकांची अवस्था बिकट झाली होती. या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी दोन वेगवेगळे रस्ते असूनही दुचाकी तसेच चारचाकी वाहने विरुद्ध दिशेने घुसवून तेथे वाहतुकीचा बोजवारा उडत होता. सकाळी 8 वाजता शाळा सुरू होण्याच्यावेळी व दुपारी दीड वाजता शाळा सुटण्यावेळी या ठिकाणी वाहतूक पोलिस ठेवूनही ही कोंडी सुटत नव्हती. या रस्त्याच्या बाजूने शाळेच्या शिक्षकांचीही वाहने उभी केली जात असल्याने तेथे विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यावर उपाय काढण्यासाठी आज महासंचालक जसपाल सिंग यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर तसेच पणजीचे वाहतूक पोलिस निरीक्षक ब्रँडन डिसोझा उपस्थित होते.

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी सांगितले की, सकाळी व दुपारी कुजिरा संकुल येथे वाहतूक पोलिस तसेच स्वयंसेवक तैनात करण्यात येतील. विद्यार्थ्यांना शाळेत वाहनाने घेऊन येणाऱ्या पालकांना वाहनांची एकच रांग करण्याचे आवाहन ध्वनिक्षेपकावरून वाहतूक पोलिस करतील. पालकांनी वाहतुकीसाठी अधिक रांगा करू नये, असे वाहतूक पोलिसांकडून आवाहन केले जाईल. वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वयंसेवक तैनात करण्यासाठी नेमण्याचे संबंधित अधिकारिणीला लेखी पत्र पाठवले जाईल. पालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सिंग यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT