Vivek Kolambkar Dainik Gomantak
गोवा

Vivek Kolambkar: विवेक कोळंबकर यांची 'आंतरराष्ट्रीय' नियुक्ती; भारत-ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील क्रिकेट सामन्यासाठी सामनाधिकारी

Vivek Kolambkar BCCI Match Referee: गोव्याचे माजी रणजी संघ कर्णधार, प्रशिक्षक, तसेच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सामनाधिकारी मंडळाचे सदस्य असलेले विवेक कोळंबकर येत्या ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनाधिकारी बनतील.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याचे माजी रणजी संघ कर्णधार, प्रशिक्षक, तसेच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सामनाधिकारी मंडळाचे सदस्य असलेले विवेक कोळंबकर येत्या ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनाधिकारी बनतील. असा मान मिळविणारे ते पहिले गोमंतकीय ठरतील.

ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारत दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन मल्टि-डे (युवा कसोटी) सामने यजमान संघाविरुद्ध खेळेल. मल्टि-डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी ‘बीसीसीआय’ने ४९ वर्षीय कोळंबकर यांची सामनाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हा चार दिवसीय सामना ५ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत अहमदाबाद येथे खेळला जाईल.

गोव्याचे तंत्रशुद्ध, शैलीदार फलंदाज ही ओळख असलेले डावखुरे फलंदाज विवेक कोळंबकर यांनी राज्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९९५-९६ ते २००५-०६ या कालावधीत प्रतिनिधित्व केले. ते ४० रणजी सामने, तर २७ लिस्ट ए (एकदिवसीय) सामने खेळले. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत त्यांनी १६०८ धावा करताना दोन शतके व सहा अर्धशतकांची नोंद केली. त्यांनी रणजी स्पर्धेत हैदराबादविरुद्ध १०६ धावांची, तर सौराष्ट्रविरुद्ध १२० धावांची खेळी केली होती.

आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी म्हणून बीसीसीआयने नियुक्ती केल्याबद्दल गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) अध्यक्ष महेश देसाई, सचिव तुळशीदास शेट्ये आणि व्यवस्थापकीय समितीने विवेक कोळंबकर यांचे अभिनंदन केले असून त्यांना सुयश चिंतिले आहे. कोळंबकर सध्या ‘प्रोव्हिडंट फंड’च्या गोवा विभागात कार्यरत असून जीसीएच्या सामनाधिकारी जबाबदारीतही सक्रिय असतात.

दशकभराची कारकीर्द

निवृत्तीनंतर कोळंबकर बीसीसीआयच्या सामनाधिकारी परिक्षेत उत्तीर्ण झाले आणि या भूमिकेत २०१७-१८ पासून कारकिर्दीस सुरवात झाली. सुरवातीस ज्युनियर वयोगटातील स्पर्धांत सामनाधिकारी म्हणून ठसा उमटविल्यानंतर त्यांना ‘बीसीसीआय’ने २०२२-२१ मध्ये बढती दिली. तेव्हापासून त्यांनी १० प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात, ७ लिस्ट ए, तर २४ टी-२० सामन्यांत सामनाधिकारी या नात्याने योगदान दिले आहे. जानेवारी २००६ मध्ये हिमाचल प्रदेश विरुद्ध जम्मू-काश्मीर यांच्यातील रणजी सामन्यात ते सामनाधिकारी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT