Vithalapur Karapur Theft Canva
गोवा

Vithalapur Theft: महिलांच्या हुशारीमुळे चोरीचा प्रयत्न फसला! संशयित पडला छपरावरून खाली; विठ्ठलापूर येथील घटना

Vithalapur Karapur: विठ्ठलापूर-कारापूर येथे एका घरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. मात्र, घरातील महिलांच्या सतर्कतेमुळे मध्यरात्री घराच्या छपरावर चढलेल्या एका संशयित युवकाला पकडण्यात स्थानिकांना यश आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Vithalapur Karapur Theft News

डिचोली: डिचोलीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असतानाच मध्यरात्री विठ्ठलापूर-कारापूर येथे एका घरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. मात्र, घरातील महिलांच्या सतर्कतेमुळे मध्यरात्री घराच्या छपरावर चढलेल्या एका संशयित युवकाला पकडण्यात स्थानिकांना यश आले.

पळ काढताना पकडल्यानंतर स्थानिकांनी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस या संशयित युवकाबद्दल चौकशी करत आहेत. मात्र, पळण्याच्या प्रयत्नात छपरावरून खाली पडल्याने संशयित युवक काही प्रमाणात जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

संशयित युवक विठ्ठलापूर भागातील नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे चोरी करण्याच्या उद्देशानेच तो घरावर चढला असावा, या संशयाला पुष्टी मिळत आहेत. या युवकाबद्धल पोलिसांनी माहिती उघड केली नसून, त्याच्याबरोबर आणखी कोण होते का, त्यादृष्टीने पोलिस तपास सुरू आहे.

युवकासोबत साथीदार असण्याची शक्यता!

विठ्ठलापूर येथील एका घरात कैसरे कुटुंब भाड्याने राहत आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास छपरावर आवाज ऐकू येऊ लागल्याबरोबर गौरी कैसरे या महिलेने जवळच राहणाऱ्या त्यांच्या नणंदेला मोबाईलवरून फोन केला. गौरी त्यांची नणंद आणि अन्य महिला बाहेर आल्या.

आरडाओरड करताच, पळून जाण्याच्या प्रयत्नात संशयित युवक घराच्या छपरावरून खाली पडला. तोपर्यंत शेजारी उठले आणि त्यांनी संशयित युवकास पकडले. या युवकाबरोबर त्याचे साथीदार होते आणि ते पळून गेले असावेत, असा संशय गौरी कैसरे आणि अन्य महिलांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT