Moscow Goa Flight Bomb Threat Dainik Gomantak
गोवा

Moscow-Goa फ्लाईटमधील प्रवाशांचे हाल, विमानतळावरील व्हिडिओ आला समोर

या विमानातील प्रवाशी ९ तासापासून जामनगर विमानतळावर अडकले आहेत.

दैनिक गोमन्तक

Moscow Goa Flight Bomb Threat: मास्कोवरुन गोव्याला येणाऱ्या विमान बॉम्ब आहे असी माहिती मिळताच विमानाचे गुजरात येथील जामनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.

या फ्लाईटमध्ये 244 प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशी ९ तासापासून जामनगर विमानतळावर अडकले आहेत. याचा व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे. तर हे विमान गोव्यासाठी ११ वाजता रवाना होउ शकते.

दरम्यान, मॉस्कोहून दाबोळी विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असलेल्या रशियन चार्टर विमानात बॉम्ब असल्याची माहिती सोमवारी रात्री उशिरा गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोलला मिळाली होती. यामुळे या विमानचे तातडीने जामनगर-गुजरात विमानतळाकडे वळवण्यात आले.

तिथे रात्री 9.49 वाजता विमानाचे सुरक्षित लॅन्डिंग करण्यात आले. सध्या हे विमान आयसोलेशनमध्ये असून सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. या बॉम्बच्या धमकीमुळे दाबोळी विमानतळावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मॉस्कोहून गोव्याला उड्डाण करणारे रशियन हवाई कंपनी अझूर एअरच्या विमानात स्फोटक बॉम्ब असल्याचा एक फोन पोलिसांना आला. त्याचवेळी गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोल याच आशयाचा एक मेल प्राप्त झाला. यानंतर हायअलर्ट जारी करून विमानाच्या पायलटला सूचित करण्यात आले.

दाबोळी’वर खळबळ

गोवा पोलिस (Goa Police) देखील या घटनेमुळे सतर्क झाले असून, दाबोळी विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल नेमका कुठून आला? कुणी केला याची चौकशी केली जात आहे.

रात्री उशिरा पोलिसांची उच्च बैठक सुरू झाली होती. बॉम्बची माहिती मिळताच दाबोळी विमानतळावर बॉम्बशोधक पथक तसेच अग्निशमन दलाचे पथक तत्काळ पोहोचले. याशिवाय सीआयएसएफचे अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक देखील हजर झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

Bonderam: 'दिवाडी बेट' सजले! ‘बोंदेरा’ उत्साहात साजरा; सामुदायिक एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

Salvador Do Mundo: साल्वादोर द मुंदचे ग्रामस्थ आक्रमक! कचरा, मैदानाची दुरवस्था, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT