NBA Goa
NBA Goa Danik Gomantak
गोवा

NBA Goa: आता दृष्टिहीन विद्यार्थी स्वत:च परीक्षा देऊ शकतील

दैनिक गोमन्तक

दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड गोवा यांनी क्रांती करणाऱ्या एका तंत्रज्ञानाला हिरवा कंदील दाखवला आहे. यामूळे दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या जीवनातील अंधार संपवण्यासाठी हे पाऊल उपयोगी ठरणार आहे. कारण या तंत्रज्ञानाच्या आधारे दृष्टिहीन विद्यार्थी स्वत:च्या परीक्षा स्वत: देऊ शकतील असे सांताक्रूझ, पणजी येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड यांनी म्हटले आहे.

(visually impaired students may be able to answer exam unassisted National Association for Blind goa)

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेचे अध्यक्ष रोझेंडो मेंडोन्सा म्हणाले की, येत्या काही दिवसात ज्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी स्वतःचे उत्तर स्वतः देण्याचा पर्याय निवडला आहे. अशा विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि इयरफोन प्रदान केले जाणार आहेत. ज्याला एक स्क्रीन रीडर असेल जो हा सर्व मजकूर वाचेल, या स्क्रीन रीडरवर विद्यार्थी आपल्या स्थानिक भाषांसह अनेक वेगवेगळ्या भाषेचा सर्व मजकूर वाचू शकणार आहे. त्यामूळे दृष्टिहीन विद्यार्थी स्वत:च्या परीक्षा स्वत: देऊ शकतील.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड गोवा मंडळाने दाखवला हिरवा कंदिल

या तंत्रज्ञानाला आता नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड गोवा मंडळाने हिरवा कंदिल दाखल्याने दृष्टीदोषित विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अंधकार आता काहीसा कमी होण्यास मदत होणार आहे.

याबाबात बोलताना एनबीए गोवाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे की, लेखकांच्या मदतीशिवाय परीक्षांना उत्तर देण्यास इच्छुक उमेदवार आहेत. त्यांना लॅपटॉप देण्यात येतील. या तंत्रज्ञानाने पुढील दीड वर्षात, दृष्टीदोष असणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या परीक्षांना लेखकासाठी पर्याय न स्विकारता हा पर्याय स्विकारल्यास याची निश्चिच मदत होणार आहे.

या तंत्रज्ञानामूळे विद्यार्थी त्यांची उत्तरे लॅपटॉपवर टाइप करतील

सांताक्रूझ येथील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (एनएबी) ने तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी आणि त्याचा वापर करताना वेग वाढविण्यासाठी दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण सुरू केले आहे. अशी ही माहिती एनबीएच्या अध्यक्ष रोझेंडो मेंडोन्सा यांनी दिली आहे.

पूढे बोलताना मेंडोन्सा म्हणाल्या की, “दृष्टिहीन विद्यार्थ्यांना स्वतःचा सन्मान आहे. आणि स्वत: प्रयत्नात करताना स्वत:चा अभिमान वाटेल. यापूर्वी देशातील अनेक राज्यांमध्ये हा प्रयोग केला गेला आहे. हा प्रयत्न लवकरच गोव्यात केला जाईल तसेच हे तंत्रज्ञान एनएबी प्रथम आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करेल. जेणेकरून त्यांच्या 10 वी च्या परीक्षेचे उत्तर देण्यापूर्वी त्यांना दोन वर्षांचा अनुभव ही मिळेल. असे ही त्या यावेळी म्हणाल्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

पालकांना त्यांच्या मुलांची नावं राहुल गांधी किंवा लालू यादव ठेवण्यापासून कोण रोखू शकेल?: जाणून घ्या SC ने असे म्हटले

SCROLL FOR NEXT