Chief Minister Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे मुख्यमंत्री अमित शहा यांच्या भेटीला!

सीटी रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे (Sadanand Shet Tanwade), संघटनमंत्री सतीश धोंड सहभागी

दैनिक गोमन्तक

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे (Assembly elections) बिगुल वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) राजकीय पक्षांनी आपली राजकीय तयारी सुरु केली आहे. यातच आता भाजपला (BJP) पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. गोव्यातल्या निवडणूका आणि इतर मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्याबरोबर बैठक सुरू झाली असून बैठकीत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सीटी रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे (Sadanand Shet Tanwade), संघटनमंत्री सतीश धोंड सहभागी झाले आहेत.

दरम्यान, भाजपशासित राज्ये असलेल्या गुजरात, उत्तराखंड येथेही मागील काही दिवसांपूर्वी अचानक मुख्यमंत्री बदलण्यात आले होते. तर गोव्यातही अशा बदलांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री असणारे विश्वजित राणे किंवा चंद्रकांत कवळेकर यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार का? अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

तसेच, गोवा विधासभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून गोव्याचे प्रभारी म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी गोव्याला येऊन प्रचाराचे रणशिंग फुंकले होते. राज्यात विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर निवडले, आणि सत्ता स्थापन करेल असं यावेळी त्यांनी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naibag Firing: 3 वर्षांपूर्वीची गोव्यातील चतुर्थी, वाळूमाफियांचा कुडचडेत गोळीबार; कामगाराने गमावला होता प्राण

Illegal Sand Mining: अवैध वाळू उपसा रोखण्‍यासाठी गोव्यात दिशानिर्देशांचे पालन होतेय का?

Gold Silver Rate Today: सोनं, चांदी झालं महाग! काय आहेत मुंबई, गोवा, पुणे आणि नागपुरात ताजे भाव? वाचा

'त्यांचे वय झाल्याने त्यांना आदल्या दिवशी काय बोललो, याची आठवण नसावी', वीजदरवाढीच्या गोंधळावरून आपची ढवळीकरांवर टीका

Goa Village Survey: 'मच्छीमार' गावांचे सीमांकन वादग्रस्त! तज्ज्ञांकडून तपासाची मागणी; नकाशांचा शहानिशा अनिवार्य

SCROLL FOR NEXT